Kalyan Double Murder: कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड, पत्नी नंतर मुलाचा गळा दाबून केला खून, आरोपी फरार

एका व्यापाराने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Crime (PC- File Image)

Kalyan Double Murder: कल्याण शहरात एकाच घरात दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका व्यापाराने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील रामबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. व्यापारी दोघांचा खून करून घटनास्थळावरून फरार झाला आहे. दिपक गायकवाड असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याच्या शोधात आहे. दुहेरी हत्याकांडनंतर शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील रामबाग येथील ही घटना आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली. आरोपी पत्नी आणि मुलासोबत कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीनमधील एका इमारतीत रहात होता (हेही वाचा-बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह लंडन येथील नदीत आढळला

हत्येचं कारण अस्पष्ट

काल दुपारी दिपकला नातेवाईंकाचा फोन आला. बऱ्याच वेळ फोनवर बोलत होता त्यानंतर अचानक त्याने पत्नी आणि मुलाचा गळा दाबला या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण थोड्याच वेळाने आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. आरोपीने असे का केले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतला त्यांना दोघांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले. हे दृश्य पाहून नातेवाईक हादरले त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सुरु आहे. कल्याण परिसरात आरोपीची खेळण्याची दुकान आहे. या दुहेरी हत्याकांडने शहरात मोठी खळबळ माजली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement