Pune Accident: पुण्यात कार चालकाचे नियत्रंण सुटलं, एकाच वेळी पाच मजूरांना धडकली, घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव एका कारने पाच परप्रांतीय मजूरांना चिरडले आहे. या अपघातात पाच पैकी तीन जणांंचा मृत्यू झाला आहे.

Pune Accident: पुण्यात कार चालकाचे नियत्रंण सुटलं, एकाच वेळी पाच मजूरांना धडकली, घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Accident (PC - File Photo)

Pune Accident: पुण्यात भरधाव एका कारने पाच परप्रांतीय मजूरांना चिरडले आहे. या अपघातात पाच पैकी तीन जणांंचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण- नगर महामार्गावर हा अपघात झाला. जखमींवर सद्या पुण्यातील आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे मजूर कामासाठी काही दिवसांपुर्वीच पुण्यात आले होते. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करत होते. रविवारी हा अपघात, रात्री आठच्या सुमारास झाला.या भीषण अपघाता मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण मार्गावरील डिंगोरे येथील दत्त मंदिरा जवळील कठेश्वरी पुलालगत हा अपघात झाला.जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत. कार चालकाचे कारवरिल नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. या अपघतात दोघांच जागीच मृत्यू झाला. तर एकाल रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. यात आणखी दोन मजूर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे, पोलीसांना घटनेची माहिती घेत पंचनामा केला आहे. हे मजूर कामासाठी पुण्यात आले होते आणि रात्री कामावरून घरी जात असताना हा अपघात झाला.

(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2023 09:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).