Coronavirus: कल्याण मधील 104 वर्षांच्या आनंदी झा यांनी केली कोरोनावर मात, 11 दिवसांनी घरवापसी, वाचा सविस्तर

23 जूनच्या त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाचे  (Coronavirus In Maharashtra) सावट दिवसागणिक गडद होत आहे. पण याही परिस्थतीत एक दिलासादायक वृत्त समोर येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका धिक वयाच्या व्यक्तींना असल्याचे म्हंटले जात असताना, आता कल्याण मधील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. कल्याण पूर्वेच्या दुर्गा मात मंदिर परिसरात राहणाऱ्या आनंदी झा या 104 वर्षीय वृद्धाने 11 दिवसात कोरोनाला हरवून घरवापसी केली आहे. 23 जूनच्या त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्या नंतर ठाणे येथील वेदांत रुग्णालयात झा यांना दाखल करण्यात आले होते, याठिकाणी उपचार घेऊन काल, शनिवारी 4 जुलै रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. झा यांच्या घरवापसीला त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी टाळया वाजवून, फुले उधळून साजरे केले. तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण जाणुन घ्या

यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातच सर्वात कमी वयाच्या म्हणजेच अवघ्या 6 महिन्याच्या बाळाने आणि आणि सर्वाधिक 92 वर्षीय महिलेने सुद्धा कोरोनावर मात केली होती. कल्याण डोंबिवली मध्ये दिवसागणिक 500 च्या संख्येने आता रुग्णांची वाढ होत आहे मात्र रिकव्हरी रेट सुद्धा दिलासादायक असल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जातेय.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2 लाखाच्या पार गेली आहे. राज्यात आतापर्यंत 2,00,064 कोरोनाबाधित आढळले असून यापैकी 83295 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. आतापर्यंत एकूण 108082 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत राज्यात 8671 जणांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे.