Mobile Verification Scam: तोतया मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकाराला मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्याची धमकी; सोशल मीडियावर पडताळणी घोटाळा उघड
धक्कादायक म्हणजे हे तोतया मुंबई पोलीस असल्याचे सांगत लोकांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फसवणूक करत असत.
Cyber Crime: मुंबई पोलीस (Mumbai Police) असल्याची बतावणी करुन फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुंबईतील पत्रकाराने पर्दाफाश (Mobile Verification Scam) केला आहे. धक्कादायक म्हणजे हे तोतया मुंबई पोलीस असल्याचे सांगत लोकांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फसवणूक करत असत. शोध पत्रकार गौरव दास यांनी पोलिसांसोबत या तोतयांबाबत तपशीलवार माहिती सामायिक केल्यानंतर खळबळजनक प्रकार पुढे आला. या सर्वच प्रकरणाची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
पत्रकार गौरव दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितले की, त्यांना एक फोन कॉल आला. फोनवरील व्यक्ती आपण मुंबई पोलीस असल्याचे सांगत होते. त्यापैकी एकाणे आपण 'प्रदीप सावंत' नावाचा मुंबई पोलीस असल्याचे सांगिले. विशेष म्हणजे त्याने आपले ओळखपत्रही दास यांना सामायिक केले. या घोटाळ्याची सुरुवात ऑटोमेटेड व्हॉईस कॉलने झाली. कथितपणे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून, दास यांना फोनकॉलद्वारे इशारा देण्यात आला की, त्यांचा नंबर दोन तासांत ब्लॉक केला जाईल. कारवाई टाळायची असेल तर फोन सुरु असताना आपल्या मोबाईलवरुन 9 अंक दाबून अधिक माहिती घ्या. दास यांनी तसे केल्याने दास यांचा फसवूक कराऱ्या तोतयांसोबत संवाद घडला.
एक्स पोस्ट
तोतया असलेला पहिला व्यक्ती आपण दूरसंचार विभागातून बोलत असल्याचा दावा करत होता. त्याने सांगीतले की, त्याच्याकडे दासच्या नंबरवर बेकायदेशीर कृत्यांसाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसऱ्या तोतयाने आपण पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगत दास यांना सांगितले की, चौकशीसाठी प्रत्यक्षात हजर राहता येत नाही. त्यामुळे आपण ऑनलाईन जबाब नोंदवावा. दरम्यान, पोलीस गणवेशात असलेल्या आणि स्वत:ची ओळख प्रदिप सावंत असल्याचे सांगणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला आणि या फसवूक प्रकरणाची व्याप्ती आणखीच वाढवली. मात्र, हा व्यक्ती मराठीत बोलत असला तरी त्याचे उच्चार मराठी नव्हते. त्यामुळे दास यांचा संशय वाढला आणि त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले.
एक्स पोस्ट
एक्स पोस्ट
चौथ्या एका तोतयाने दास यांना खोटा आधार क्रमांक दिला आणि सांगितले की, ते एका मोठ्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अडकले आहेत. इतकेच नव्हे तर त्याने दाऊद इब्राहिम त्याचा काका असल्याचाही त्याने ओळख केला. त्यावर दास यांची खात्री पटली की, हा काहीतरी फसवणूक आणि घोटाळ्याचाच प्रकार आहे. दास यांनी थेट फोन बंद केला आणि आपला अनुभव सोशल मीडियावर कथन केला. दरम्यान, दास यांनी आपला अनुभव सामायिक करतात सोशल मीडियावर इतर वापरकर्त्यांनीही आपले अनुभव सामायिक केले.