Jejuri Shashan Aplya Dari: जेजूरीत उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन, प्रशासनाकडून वाहतुकीत बदल
जेजुरीत नागरिकांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.
Jejuri Shashan Aplya Dari: महाराष्ट्रातील जेजूरी येथे शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवारी हा कार्यक्रम जेजरीत पार पडणार असल्यामुळे जेजरू येथे जय्यत तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहे. बराच दिवसानंतर शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी विकास आराखड्याचे भुमिपूजन देखील होणार आहे. त्यामुळे जेजूरीत नागरिकांची तयारी सुरु झाली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती असणार असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे.
जेजूरी येथे शासन आपल्या दारी उपक्रमामुळे उद्या पुणे ते बारामती या मार्गावर जड, अवजड आणि इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून जिल्हा अधिकाऱ्याने वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहे. सोमवारी ७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर मार्गावर बंद करण्यात आले आहे. जेजूरीत या कार्यक्रमातसाठी सर्वांची उस्तुकता लागली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
वाहतुकीस लावलेले निर्बंध ७ ऑगस्ट रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील.नागरिकांना वाहतुकीचा त्रास होवू नये यामुळे प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सोमवारी या कार्यक्रमात रोजगार मेळावा देखील होणार आहे. त्यामुळे तरुणांना देखील रोजगाराची संधी मिळणार आहे. या आधी रेल अलर्ट असल्यामुळे जेजूरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.