Jayant Patil On Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य, 'ती तर खेळी'

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी जे विधान केले तो त्यांचा अधिकार आहे, असे म्हणता येईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil | (Photo Credit: Archived, edited, representative images)

वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात नुकतीच युती झाली. पर्यायाने महाविकासआघाडीमध्ये चौथा भिडू आलेला आहे. दरम्यान, असे असले तरी वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात भलतीच चर्चा सुरु झाली. दरम्यान, जयंत पाटील (Devendra Fadnavis) यांनी या सर्व मुद्द्यांवर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असू शकते. प्रकाश आंबेडकर यांनी जे विधान केले तो त्यांचा अधिकार आहे, असे म्हणता येईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी एबीपी माझा वृत्तवाहीनिशी बोलताना सांगितले की, मला वाटत नाही की अजित पवार हे भाजपच्या अमिशाला भूलले असतील. हा शपथविधी जेव्हा झाला त्या वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट होती. ही राजवट हटविण्यासाठी शरद पवार यांनी खेळी केलेली असू शकते. त्यामुळेच हा शपथविधी झाला असावा. त्यामुळे अजित पवार यांनी त्या काळात जी वक्तव्ये केली त्याला फार महत्त्व असल्याचे मला वाटत नाही, असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिली. शिवसेनेला गरज होती त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला कारण आम्हाला सत्तेत यायचे होते. शिवसेनेचे आमदार गेल्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळले. तरीही राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत साथ दिल्याचे जयंत पाटील ठामपणे म्हणाले. (हेही वाचा, Jitendra Awhad Controversy: जितेंद्र आव्हाडांवरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंबर कसली, जयंत पाटलांसह अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल)

प्रकाश आंबेडकर यांनी 'शरद पवार हा भाजपचाच माणूस आहे. येत्या काही काळात ते पुन्हा दिसून येईल' असे विधान नुकतेच केले होते. पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत आंबेडकर यांनी म्हटले होते की, पहाटेच्या शपथविधीचे सरकार कोसळल्यावर चार दिवसांनी एका वर्तमानपत्रात अजित पवार यांची मुलाखत छापून आली होती. यात त्यांनी म्हटले होते, सगळे मलाच जबाबदार धरत आहे. पक्षाचेच ठरले होते. फरक इतकाच की मी सर्वात आधी गेलो. त्यामुळे यावरुनच स्पष्ट होते की, शरद पवार हे भाजपचा माणूस आहेत.