Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला, शेतकऱ्यांना दिलासा
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी येलो अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार जोरदार पावसाने हजेरी लावली.
मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात (Marathwada) परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान अशातच गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीला देखील महापूर आला असून मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठा (Water Level) झपाट्याने वाढला आहे. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. तर ,जायकवाडीत 36.35 टक्के पाणीसाठा आहे. (हेही वाचा - Nagpur Flood 2023: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून पूरग्रस्त नागपूरची पाहणी (Watch Video))
नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी येलो अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने सहा जिल्ह्यांत दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या सहा जिल्ह्यांतील 50 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
जिल्ह्यातील 20 पैकी आठ मंडळांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. आनंदाची बाब म्हणजे 8 मंडळांत 100 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. दरम्यान, संपूर्ण मराठवाड्यात अजूनही 24 टक्के पावसाची तूट कायम आहे.