Jalna Shocker: सहा वर्षांच्या मुलाला सळईचे चटके, भीक मागण्यासाठी दबाव; जालना येथील मद्यपी बापाचे कृत्य

या व्यक्तीने पोटच्या मुलावर भीक (Begging) मागण्यासाठी दबाव टाकला. इतकेच नव्हे तर भीक मागण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या बापाने मुलाला लोखंडी सळीने चटके (Drunken Father Burned Son) दिले.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Crime News Jalna: जालना येथील वडील असलेल्या एका व्यक्तीची क्रूरता पुढे आली आहे. या व्यक्तीने पोटच्या मुलावर भीक (Begging) मागण्यासाठी दबाव टाकला. इतकेच नव्हे तर भीक मागण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या बापाने मुलाला लोखंडी सळीने चटके (Drunken Father Burned Son) दिले. पीडित मुलगा केवळ सहा वर्षे वयांचा आहे. त्याच्या तळहात, तळपाय, गुडघा, पाठ, मांडी असा विविध अवयवांवर डागल्याच्या खुणा दिसत आहेत. ही घटना जालना शहरातील मंगळ बाजार परिसरात घडली आहे. या मुलाच्या डोक्यालाही चटके दिल्याचे पाहायला मिळत आहे.

वडील नेहमी नशेत

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या वडिलांसोबत जलना शहरातील मंगळ बाजार परिसरात राहतो. पीडित मुलाचे वडील प्रचंड दारु पितात. त्यांना दारुचे प्रचंड व्यसन आहे. त्यामळे तो दिवसातील 24 तास त्याने मद्यपान केलेले असते. कायम नशेत असलेल्या या व्यक्तीचे स्वत:वरही नियंत्रण नसते. त्यामुळे दरुसाठी पैसे जमविण्यासाठी तो सातत्याने वेगवेगळे उद्योग करतो. दरम्यान, त्याची नजर आपल्याच मुलाकडे वळली. त्याने आपल्याच मुलाला दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मुलगा केवळ सहा वर्षांचा आहे. असहाय असलेल्या या मुलाला पैसे आणण्यासाठी बापाने भीक मागण्यास सांगितले. तसेच, त्याने भीक मागावी यासाठी त्याच्या हातापायाला चटके दिले. (हेही वाचा, Navi Mumbai Shocker: आपल्या 14 वर्षांच्या सावत्र मुलीवर गेल्या 4 वर्षांपासून बलात्कार; आरोपी वडिलाला अटक)

मुलाला मानसिक धक्का

बापाने लोखंडी सळई वापरून दिलेल्या चटक्यांमुळे मुलाचे शरीर चांगलेच भाजले आहे. तसेच, प्रचंड वेदनांनी तो हादरुन गेला आहे. भयभीत झालेला हा मुलगा मानसिकदृष्ट्याही खचल्याचे पाहायला मिळत आहे. चाइल्डलाइन जिल्हा बाल सुरक्षा कक्षाला एका निनावी फोनद्वारे सदर घटनेबाबत माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता मुलाला चटके दिल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पीडित बालकाला तातडीने ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. (हेही वाचा, Kolhapur News: मुलीचा प्रेमविवाह होऊ नये यासाठी आई-वडिलांकडूनच जादूटोणा, अघोरी प्रकार; कोल्हापूर जिल्ह्यातील घटना)

पीडित बालकावर रुगणालयात उपचार

दरम्यान, नराधम बापाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये सदर बाजार पोलिसांना बालन्याय अधिनियमानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पीडित बालकावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयातील अहवाल प्राप्त होताच आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी त्याला भीक मागण्यासाठी जबरदस्ती केली. त्याने नकार देताच त्याला चटके देण्यात आले.

जन्मदात्या बापाचे कृत्य पाहून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. त्यासोबतच जर कुटुंबीय आणि पालकांकडूनच लहान मुले सुरक्षीत नसतील तर समाजातील इतर घटकांकडून काय अपेक्षा ठेवायची असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.