Jalna Crime: जालन्यात गाडी धुण्याच्या वादातुन एकावर जीवघेणा हल्ला
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तीनही आरोपीचा शोध सुरु केला आहे.
सध्या किरकोळ घडामोडीवरुन मारहाणीचे प्रकार घडताना दिसत आहे. जालना शहरात देखील अशीच एक घटना घडली आहे. जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या वाशिंग सेंटरवर गाडी धुण्यावरून (Jalna News) झालेल्या किरकोळ कारणावरून वाद झाला. (Crime News) या वादातून एकाला आज पोटात खंजीर खुपसून गंभीर जखमी केल्याची घटना शिवाजी पुतळा परिसरात घडली आहे. शेख अलीम शेख जमील अस यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (हेही वाचा- Kishore Gaikwad Murder: Ramdas Athawale यांच्या RPI चा पदाधिकारी किशोर गायकवाड चा पवईत खून; आरोपी अटकेत)
शेख अलीम हा वाशिंग सेंटरवर गाडी धूत असताना त्याचा एकाशी काल वाद झाला होता. त्या वादानंतर आज तिघेजण मोटरसायकलवरून जालना शहरातील वशिंग सेंटरजवळ आले. त्यांनी गाडी उभी करून खाली उतरून शेख अलीम याच्याजवळ आले आणि त्यांनी कमरेला खोसलेला खंजर काढून अलीम याच्या पोटात खुपसला. यात शेख अलीम हा जखमी होऊन खाली पडला. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
दरम्यान डॉक्टरांनी पाहणी करून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात रेफर केले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तीनही आरोपीचा शोध सुरु केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2023 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

