Jalgaon: बंडखोर भाजप नगरसेवकांना अपात्रेच्या नोटीसा; राजकीय वर्तुळात कारवाईबाबत उत्सुकता
एकाच वेळी 27 नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपला मोठाच हादरा बसला. परिणामी भाजप नेतृत्व या बंडखोरीबाबत काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता असतानाच विभागीय आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
जळगाव महापालिका (Jalgaon Municipal Corporation) प्रभाग समिती निवडणुकीत नगरसेवकांनी बंडखोरी केली आणि भाजपा (BJP) बॅकफुटवर गेला. एकाच वेळी 27 नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपला मोठाच हादरा बसला. परिणामी भाजप नेतृत्व या बंडखोरीबाबत काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता असतानाच विभागीय आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या बंडखोर भाजपा नगरसेवकांना व्हीपचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात का येऊ नयेत? याबाबत आयुक्तांनी नोटीसा बजावल्या आहेत.
जळगाव महापालिका प्रभाग समिती निवडणुकीत पक्षाने व्हीप बजावूनही भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. व्हीप न पाळता या नगरसेवकांनी विरोधात जाऊन शिवसेना पक्षास मदत केली होती. यावर विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. फुटीर गटातर्फे गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर निर्णय देतांना आयुक्तांनी या नोटीसा बजावल्या. (हेही वाचा, BJP Corporators Joins Shiv Sena: मोठी बातमी! जळगावात भाजपला मोठा धक्का, 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश)
मार्च 2021 च्या अखेरीस जळगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपमध्ये मोठी फूट पडली होती. त्यातून भाजप बॅकफूटला गेला आणि जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेला भाजपच्या बंडखोर नगरसेवकांची मदत मिळाली. त्यामुळे शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजपतील फुटीर गटाचे नेते कुलभूषण पाटील यांची निवड झाली. तसेच, भाजपमधील बंडखोर गटाने महापालिका सभागृहात पत्र देण्यात आले की, आपल्याकडे सर्वाधिक 30 नगरसेवकांचे बहुमत आहे. तसेच दिलीप पोकळे हे सभागृहातील गटनेता असतील.
दरम्यान, गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व सदस्यांसाठी व्हीप बजावला होता. यात भाजपच्या 27 नगरसेवकांनी व्हीपचे उल्लंघन केले. त्यामुळे दिलीप पोकळे आणि कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली की, या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या व्हिपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी. या तक्रारीवरुन विभागीय आयुक्तांनी या नगरसेवकांना नोटीसा पाठवल्या आहेत. आता पुढी कारवाईबाबत उत्सुकता आहे.