ITI Admission 2020: 10वी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आजपासून admission.dvet.gov.in वर करता येणार ऑनलाईन अर्ज
त्यामुळे रिक्त जागांवर 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरण्यास अधिकचा अवधी दिला आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या दहावीच्या (Maharashtra State SSC Board) विद्यार्थ्यांचा पुरवणी परीक्षा लागला आहे. यामध्ये उर्त्तीर्ण झालेल्यांना आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI)मध्ये प्रवेशासाठी एक संधी खुली करण्यात आहे. आज 1 जानेवारी पासून आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्याची संधी आहे. दरम्यान यापूर्वीच ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत अशांना ते एडीट करण्याची देखील संधी दिली जाणार आहे.यंदा कोरोना वायरस संकट आणि मराठा आरक्षण यांच्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडत होती. इथे पहा परिपत्रक.
यंदा इतर वर्षाच्या तुलनेत आयटीआयला प्रवेश घेणार्यांच्या संख्येमध्ये घट पहायला मिळाली आहे. त्यामुळे रिक्त जागांवर 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरण्यास अधिकचा अवधी दिला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये पर पडलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल आता जाहीर झाल्याने त्या विद्यार्थ्यांना देखील एक संधी दिली जाणार आहे. admission.dvet.gov.in वर विद्यार्थी आपला आर्ज दाखल करू शकणार आहेत. Maharashtra SSC & HSC Repeater Exams Result 2020: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड फेरपरीक्षा निकाल mahresult.nic.in वर आज होणार जाहीर, कसे मिळवाल गुणपत्रक?
आयटीआय वेळापत्रक
2 जानेवारी - सर्व आयटीआयमधील रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल
1-4 जानेवारी - अर्ज करण्यासाठी मुदत
5 जानेवारी - गुणवत्ता यादी प्रसिद्ध
6-7 जानेवारी - प्रवेश प्रकिया गुणनुक्रमे सुरू
आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये यावेळेस रिक्त जागांवर विचार करताना त्या खाजगी आणि सरकारी आयआयटी मधील .असतील. 15 जानेवारी पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.