ठाकरे सरकार घेणार बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Dream Project ला लागणार ब्रेक?

या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे मोर्चा वळवत 11 लाख कोटी रुपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय ठाकरे घेतला आहे.

Uddhav Thackeray And Bullet Train (Photo Credits: PTI Pxhere)

ज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच्या सरकारच्या कामांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 2 दिवस ठाकरे सरकारासाठी फार महत्त्वाचे दिवस होते. ज्यात त्यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करायचे होते तर दुसरीकडे महाविकासआघाडीचा विधानसभा अध्यक्ष निवडला जावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. पण या दोन्ही गोष्टींमध्ये निर्णय त्यांच्या बाजूने लागला आणि संपुर्ण महाविकासआघाडीमध्ये एकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता ठाकरे सरकारचे लक्ष्य आहे की आधीच्या सरकारच्या प्रकल्पांचा फेरआढावा घ्यावा आणि योग्य ते निर्णय घेण्यात यावा. यासाठी रविवारी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आज परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे मोर्चा वळवत 11 लाख कोटी रुपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय ठाकरे घेतला आहे. दरम्यान, राज्यातील अर्थ विभागाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे तसेच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकारच्या खातेवाटपाचा पुढील दोन तीन दिवसांत निर्णय होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

याआधीच त्यांनी फडणवीस सरकारच्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून आता बुलेट ट्रेन कडे वळवलेला मोर्चा हा थोडक्यात भाजपच्या विकासकामांना ब्रेक लावण्याचे ठाकरे सरकार संकेत देत आहेत. 'पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात' संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

'सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्याचे आदेश मी दिले आहेत. या प्रकल्पांचा अंदाजे खर्च, त्यातील अडथळे आणि त्या प्रकल्पांची मुदत अशा सर्व बाजूंनी या प्रकल्पांचा आम्ही पुन्हा एकवार आढाव घेऊ. त्यानंतर त्यापैकी कोणता प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावायचा ते ठरवू. तसेच आतापर्यंत जे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात आले ते तसे घेण्याची किती निकड होती, हेही पाहू.', असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी असंही स्पष्ट केलं की त्यांचं सरकार सूडबुद्धीने कुठलेही निर्णय घेणार नाही. ते म्हणाले, 'इतर सर्व प्रकल्पांचा जसा फेरआढावा घेण्यात येणार आहे, तसाच तो बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही असेल.'