Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर फेकली शाई, भाजप नगरसेविकेसह दहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेडगे (Asha Shedge) यांच्यासह 10 जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

BJP | (File Image)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त (Pimpri Chinchwad Municipal Commissioner) राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्या नामफलकावर शाई फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेडगे (Asha Shedge) यांच्यासह 10 जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात पिपंरी पोलिसांनी माहिती दिली आहे. प्रभागातील समस्या घेऊन गेले असता राजेश पाटील भेटू न शकल्याने आशा शेडगे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी आयुक्तांच्या नाम फलकावर शाई फेकली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा शेडगे यांच्या प्रभागात सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराकडून काही ठिकाणचे खड्डे बुजवण्यात आले नाहीत. याबाबत तक्रार करण्यासाठी आशा शेडगे या आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटायला गेल्या होता. मात्र, काही कारणांस्तव राजेश पाटील आशा शेडगे यांना भेटू शकले नाहीत. याचाच राग अनावर झाल्याने आशा शेडगे यांनी आश पाटील यांच्या नामफलकावर शाई फेकली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी 8 महिला आणि 2 तरुणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. हे देखील वाचा- Pune: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल

राजेश पाटील यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत सहा महिन्यांपूर्वी आयुक्त म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली होती. राज्य शासनाचे पूर्वीपासून प्रतिनियुक्तीचे धोरण आस्तित्वात आहे. या धोरणानुसार, आयुक्त राजेश पाटील हे ओडिसा राज्यातून प्रतिनियुक्तीने महाराष्ट्रात दाखल झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif