गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युला'बाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन इंदोरीकर महाराजांची पलटी, असे बोललो नसल्याचा खुलासा

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युल्या'वरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्या या विधानाबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

Indurikar Maharaj (PC - Facebook)

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन फॉर्म्युल्या'वरुन वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्या या विधानाबाबत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली. 'सम संख्येला संग केल्यास मुलगा जन्माला येईल. तर विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी जन्माला येईल,' असं इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात म्हटले होते. या प्रकरणी त्यांनी नोटिस बजावण्यात आली होती. त्यानुसार इंदोरीकरांनी आरोग्य विभागाकडे खुलासा करत लेखी उत्तर दिले आहे. इंदोरीकरांनी मी असे कोणत्याचा किर्तनाच्या कार्यक्रमात म्हटले नसल्याचा आता दावा करत त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन पलटी मारली आहे.

इंदोरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या किर्तनात 'सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा जन्मास येईल आणि विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होते. इंदोरीकर यांचे हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप PCPNDT समितीच्या सदस्यांनी केला होता. यामुळे त्यांना नोटिस धाडण्यात आली होती. या नोटिसला आता इंदोरीकर महाराजांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यांनी उत्तरात असे म्हटले आहे की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे मला अमान्य आहेत. तसेच असे वादग्रस्त विधान मी कुठेच बोललो नसल्याचा खुलासा त्यांनी आता केला आहे.(किर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार? गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन' फॉर्म्युल्यासंदर्भात केलं 'हे' वादग्रस्त विधान)

तसेच जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान कोणतेही किर्तन केले नसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. परंतु जिल्हा चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी यावर अधिक स्पष्टीकरण देत इंदोरीकर महाराजांनी काय लेखी उत्तर दिले आहे याबाबत सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, इंदोरीकर महाराजांनी ते समाजप्रबोधनाचे काम करत असल्याचे म्हटले आहे. तसेच किर्तनाच्या कोणत्याही क्लिप आम्ही सोशल मीडियात पोस्ट करत नाही. परंतु इंदोरीकर यांनी खुलासा करताना जे स्पष्टीकर दिले आहे ते खरेच किर्तनात नसेल तर ती गोष्ट समाधानकारक असल्याचे मुरंबीकर यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement