Maharashtra Election 2019 India Today-Axis My India Exit Poll Results Live Streaming: 'इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया'चा कौल पहा कुणाच्या बाजुने?
यंदा पुन्हा भाजपा- शिवसेनेच्या पारड्यात कुणाला किती जागा येणार? याबद्दल सार्यांच्या मनात कुतुहल आहे.पहा काय सांगतोय India Today - Axis My India चा कौल
Maharashtra Vidhan Sabha Elections 2019 Exit Polls: महाराष्ट्रामध्ये आज (21 ऑक्टोबर) 288 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यांत मतदान पार पडले आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात मतदान झाले. विधानसभा मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल (Exit Polls) दाखवण्यास सुरूवात झाली आहे. राज्यामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या मतदानाचा वेध इंडिया टुडे (आज तक) - एक्सिस माय इंडिया कडून घेण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या शिवसेना - भाजपा युतीचं सरकार आहे. यंदा पुन्हा भाजपा- शिवसेनेच्या पारड्यात कुणाला किती जागा येणार? याबद्दल सार्यांच्या मनात कुतुहल आहे.
नेदरलँडमध्ये समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोल या संकल्पनेला सुरूवात केली. 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिला एक्झिट पोल आला होता. पहा महाराष्ट्रातील एक्झिट पोल पहा काय सांगतोय? इथे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स .
इथे पहा इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
महाराष्ट्रामध्ये भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मागील 5 वर्ष राज्य सरकारचा कार्यभार सांभाळत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेस 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. 21 ऑक्टोबर दिवशी पार पडलेल्या 288 विधानसभा मतदार संघामधील विधानसभेच्या जागांचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी लागणार आहे. सध्या अस्तित्त्वामध्ये असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 दिवशी संपणार आहे.