ICC World Cup Final Match: 'मटण खाऊ आल्याने भारत वर्ल्डकप हरला', सख्या भावाची हत्या; अमरावती येथील धक्कादायक घटना

'तूम्ही मटण (Mutton) खाऊन आल्यानेच भारत वर्ल्ड कप हरला', असा धक्कादायक तर्क लावत या व्यक्तीने आपल्या लहाण भावाची हत्या केली.

Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 (ICC Men's World Cup 2023) साठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. परिणामी भारताने विश्वचषक गमावला. हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला. अमरावती (Amravati) येथील एका व्यक्तीने या पराभवाला (India lost the World Cup) आपल्या धाकल्या भावाला जबाबदार धरत त्याची हत्या केली आहे. 'तूम्ही मटण (Mutton) खाऊन आल्यानेच भारत वर्ल्ड कप हरला', असा धक्कादायक तर्क लावत या व्यक्तीने आपल्या लहाण भावाला आणि वडिलांना काठीने मारहाण केली. ज्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने भावाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत आरोपीस अटक केली आहे. तसेच, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घडल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी दारुच्या नशेत तर्रर्र

अंकित रमेश इंगोले (वय 28) आणि रमेश गोविंद इंगोले (वय 65) असे पीडितांची नावे आहेत. त्यापैकी, अंकित हा मृतक आहे. तर रमेश हे आरोपी आणि मृतकाचे वडील आहेत. प्रवीण रमेश इंगोले (वय 32) असे आरोपीचे नाव आहे. सर्वजण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील राहणारे आहेत. वर्ल्डकपचा सामना पाहण्यापूर्वी अंकीत आणि त्याचे वडील रमेश हे त्याच्या मामाच्या घरी गेला होता. त्यांनी तेथे मटणाचा बेत केला. फक्कड जेवण केले आणि सामना पाहून घरी निघाले. जाताना त्यांनी प्रवीण याच्यासाठीही मटणाचा डबा आणला. ते घरी पोहोचले तेव्हा प्रवीण हा दारुच्या नशेत तर्रर्र होता.

भारत विश्वचषक पराभूत झाल्याचा राग आरोपीला अनावर

रमेश हा घरी परतला तेव्हा वर्ल्डकपसाठी अंतिम सामना सुरु झाला होता. भारत फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. भारताची फलंदाजी संपली. ऑस्ट्रेलिया फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दरम्यान, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मैदानावर पकड बसवली आणि भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला. आगोदरच धावसंख्या कमी असल्याने भारताचा आलेख घसरत गेला. परिणामी भारत पराभूत झाला. त्याचा राग मनात धरुन प्रविण याने आपल्या वडील आणि भावाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तुम्ही मटण खाऊन आल्यानेच भारत विश्वचषक सामना जिंकला नसल्याचे, म्हटले. त्याचा राग इतका विकोपाला गेला की, त्याने आपला भाऊ रमेश आणि वडील यांना चक्क काठीने मारहाण सुरु केली. यात अंकीत गंभीर जखमी झाला. ज्यात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. तर वडील रमेश हे देखील गंभीर जखमी झाले.

आरोपीला अटक गुन्हाही दाखल

प्रवीण याचा मार सहन न झाल्याने अंकित याने ने घरातून बाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठेच लागून तो खाली पडला. पाठिमागून आलेल्या प्रवीण याने काठी आणि लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गावकऱ्यांनी जखमी रमेश आणि अंकित यांना दवाखन्यात दाखल केले. तसेच, पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रमेश इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरु प्रविण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.