MNS On Indo-Pak Match: गुजरातमध्ये होणाऱ्या भारत-पाक सामन्यावर मनसे नेता संदिप देशपांडेचा आक्षेप
संदिप देशपांडे यांनी पाकिस्तान-समर्थित दहशतवादी हल्ल्यांचा समाचार घेतला, ज्याचा फटका भारताला अलीकडच्या काळात सहन करावा लागला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेचा (ICC Men's World Cup) भाग म्हणून अहमदाबादमध्ये (Ahamdabad) भारत आणि पाकिस्तान (Indo-Pak Match) यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर आक्षेप घेतला. "ज्यांनी आमच्या सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आणि आमच्या अधिकार्यांना हनी ट्रपमध्ये (Honeytrap) अडकवले... अशा राष्ट्रांशी खेळायचे का?" देशपांडे यांनी विचारले. (हेही वाचा - Money Laundering Case: मनी लाँडरिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई; महाराष्ट्रस्थित स्टील कंपनीची 517 कोटींची मालमत्ता जप्त)
संदिप देशपांडे यांनी पाकिस्तान-समर्थित दहशतवादी हल्ल्यांचा समाचार घेतला, ज्याचा फटका भारताला अलीकडच्या काळात सहन करावा लागला. “लक्षात ठेवा की सर्व हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात आहे. अशा राष्ट्राचे आपण स्वागत करावे का? हे राजकारण नाही तर राष्ट्राशी संबंधित आहे,” असे मनसे नेते म्हणाले.
“जेव्हा असे सामने होतात तेव्हा त्यांचे लोक (पाकिस्तानी नागरिक) झेंडे घेऊन येतात. हे आपण सहन करावे का? देशभरात चर्चा व्हायला हवी,” हे सर्वांना चालेल का ? असा प्रश्न देखील देशपांडे यांनी विचारला आहे. संपूर्ण देशाने या विषयावर चर्चा केली पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सरकार आणि विरोधी पक्षांना संबोधित केले पाहिजे असे देखील त्यांनी म्हटले.
यावेळी संदिप देशपांडे यांनी हे स्पष्ट केले की ते जे बोलले ते त्यांच्या भावना आहेत आणि पक्षाची भूमिका पक्षप्रमुख राज ठाकरे सांगतील.मनसेने पाकिस्तानच्या संदर्भात फक्त क्रिकेटलाच आक्षेप घेतला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, पक्षाने चित्रपटगृह मालकांना महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा पाकिस्तानी चित्रपट "द लीजेंड ऑफ मौला जाट" प्रदर्शित करण्याविरूद्ध चेतावणी दिली होती.