Coronavirus Cases In Jalna: जालना जिल्ह्यात आज सकाळी 52 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
अशातचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. जालना जिल्ह्यात आज सकाळी 52 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये जालना शहरातल्या 49 तर मंठा, बदनापूर आणि जाफ्राबाद इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1043 इतकी झाली आहे.
Coronavirus Cases In Jalna: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातचं आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. जालना जिल्ह्यात आज सकाळी 52 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये जालना शहरातल्या 49 तर मंठा, बदनापूर आणि जाफ्राबाद इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1043 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूचं आहे. जालना शहरामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात जालना जिल्ह्यात नगरपालिका, आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी 105 पथक तयार करण्यात आले आहेत. (हेही वाचा - मुंबई: अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला BMC कडून सॅनिटाईझ; प्रवेशद्वारावर containment zone चा बॅनर)
या पथकाने 4 दिवसांमध्ये घरोघरी जाऊन शहरातील 2 लाख 12 हजार 604 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात 8139 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच 223 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय काल 4360 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं.