Immunity Booster Tablets: मुंबईतील रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना BMC देणार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खास गोळ्या

सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संक्रमित रुग्ण आढळून आहेत. महाराष्ट्रामध्येही मुंबई (Mumbai) व पुणे येथील रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहेत.

Immunity Booster Tablets: मुंबईतील रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना BMC देणार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खास गोळ्या
Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: ANI|File)

सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संक्रमित रुग्ण आढळून आहेत. महाराष्ट्रामध्येही मुंबई (Mumbai) व पुणे येथील रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहेत. अशात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज, बुधवारी दिलेल्या माहितीनुसार,  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) येथे बाधित क्षेत्र (Containment Zones) आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे (Immunity Booster Tablets) वितरण करण्याचा विचार चालू आहे. याआधीच बाधित क्षेत्र आणि रेड झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना Arsenic Album 30 गोळ्या देण्यास सुरुवात झाली आहे.

पेडणेकर यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, सरकारने घरोघरी स्क्रिनिंग करणे सुरू केले आहे आणि कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर  लोकांना विलगीकरण सेंटरमध्ये ठेवले जात आहे. आयुष मंत्रालयानेही रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी Arsenicum Album 30 गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. या गोळ्या विषाणूंशी लढा देण्यास असमर्थ असलेल्या लोकांच्या प्रतिकारशक्तीला चालना देतील. सध्या हे औषध नि: शुल्क वितरीत केले जात आहे, परंतु उपलब्धता वाढल्यानंतर लवकरच हे औषध मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होईल.

संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने या झोनमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवली आहे. झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छताही केली जात आहे. मुंबईत सकारात्मक घटना वाढत असल्या तरी त्यांचा एकूण दर घटला आहे व संक्रमांची संख्या दुप्पट होण्याचे दिवस वाढले असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. या विषाणूचा प्रसार वाढू नये म्हणून बीएमसी काळजी घेतच आहे, मात्र नागरिकांनीही खबरदारीचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे किशोरी पेडणेकर यांनी मत मांडले. (हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात आपात्कालीन प्रवासासाठी E-Pass कसा मिळवायचा? सविस्तर माहिती घ्या जाणून)

Maharashtra Liquor Home Delivery: आता दारु मिळणार घरपोच; पण 'या' असतील अटी, जाणून घ्या सविस्तर - Watch Video 

दरम्यान, काल मुंबईमध्ये कोरोना व्हायरसची 426 नवीन प्रकरणे समोर आली आहे, यासह शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 14,781 वर पोहोचली आहे. कालच्या 28 अधिक मृत्युंसह आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे एकून 556 लोकांचे बळी गेले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2020 06:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).