मुंबई: पुढील 4 तासात ठाणे, पालघर परिसरात जोरदार वारा, पाऊस आणि वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता
तर पावसासोबत वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
महाराष्ट्रामध्ये अद्याप मान्सून सक्रिय झाला नसला तरीही अरबी समुद्रात 'वायू चक्रीवादळा'मुळे वातावरणात बदल झाले आहेत. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकले असले मुंबई, ठाणे, कोकण परिसरात पावसाची हजेरी दिसत आहे. मुंबई हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 4 तासामध्ये पालघर, ठाणे परिसरात वारा, पाऊस आणि वीजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे. Cyclone Vayu दरम्यान समुद्रात भरती असल्याने 12,13 जूनला मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद
ANI Tweet
ठाणे, पालघर परिसरात सुमारे 30-40 kmph वेगाने वारे वाहतील. तर पावसासोबत वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 आणि 13 जून दरम्यान समुद्रात भरती असल्याने सोबतच वायू चक्रीवादळ घोंघावत असल्याने मुंबई, पालघर, ठाणे, कोकण या भागातील समुद्र किनारी फिरण्याचा मोह टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मच्छिमार्यांनादेखील या काळात समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह महराष्ट्राला वायू चक्रीवादळाचा धोका नसल्याने कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहनदेखील पालिका प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाकडून करण्यात आले आहे.