मान्सून 6 जूनपर्यंत केरळात धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
गेल्या दोन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण पुढील तीन-चार दिवस कायम राहणार असून महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण पुढील तीन-चार दिवस कायम राहणार असून महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण झाल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (पुढील 2 दिवसात राज्यात वादळी पावसाचे होणार आगमन, हवामान खात्याचा अंदाज)
तसंच मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात नेर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या महाराष्ट्र उन्हाने तळपत आहे. त्यामुळे हे वातावरण नक्कीच काही प्रमाणात दिलासादायक आहे. 18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला. त्यानंतर 6 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळात दाखल झाल्यानंतर पुढच्या 8 दिवसात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता आहे.