उद्याचे हवामान: पुणे, सातारा घाट परिसर, रायगड जिल्ह्याला 25 जुलै दिवशी ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रामध्ये 25 जुलै दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर सोबत कोल्हापूर, नाशिक व सातारा घाट परिसर या भागात यलो अलर्ट कायम राहणार आहे.
Weather Forecast For Tomorrow: महाराष्ट्रात सर्वदूर जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यंदा एल नीनो (El Niño) च्या प्रभावामुळे राज्यात जून महिना कोरडाच गेल्याने सामान्य नागरिकांसह बळीराजा चिंतेमध्ये होता परंतू जुलै महिन्यातील पावसाच्या दमदार हजेरीमुळे पुन्हा शेतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक धरणक्षेत्रांमध्ये चांगला पाऊस बरसत असल्याने पाणीपातळीत होत असणारी वाढ आशादायी आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पुन्हा जोरदार पावसाची हजेरी पहायला मिळाली आहे. आयएमडीने देखील व्यक्त केलेल्या पुढील 5 दिवसांमध्ये कोणत्याही भागात रेड अलर्ट नसला तरीही पुणे, सातारा घाट परिसर, रायगड जिल्हा यांना पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देत दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 28 जुलै दरम्यान 25 जुलै दिवशी पुणे घाट, सातारा घाट आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 26 जुलै दिवशीही पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट असणार आहे. पुणे हवामान अंदाज: हलकी ते मध्यम रिमझिमसह ढगाळ वातावरण, कमाल तापमान 26°C.
मुंबई वेधशाळेचा पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज
महाराष्ट्रात 25 जुलैला यलो अलर्ट कोणत्या भागात?
महाराष्ट्रामध्ये 25 जुलै दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर सोबत कोल्हापूर, नाशिक व सातारा घाट परिसर या भागात यलो अलर्ट कायम राहणार आहे.
दरम्यान 27,28 जुलै दिवशी राज्यात कोणत्याही भागामध्ये रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र विदर्भासह कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडणं सोयीचं ठरणार आहे.