सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. एम. राधाकृष्णन हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

रहदारी (Archived images)

कोणतेही वाहान चालवताना तुम्ही जर वाहतुकीचे नियम पाळत नसाल तर वेळीच सावध व्हा. तुमचा वाहन चालवण्याचा परवाना तब्बल तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. वाहतूक पोलिसांकडून यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. देशामध्ये रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचा वाढता आकडा पाहून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तसेच, वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबाबतचे सरकारला निर्देश दिले. या निर्देशानंतर राज्य परिवहन विभागाने कडक धोरण अवलंबले असून, पोलिसंनाही तसे निर्देश दिले आहेत.

प्रामुख्याने कोणत्या नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द होणार?

प्रामुख्याने वरील नियमांची आणि त्याचसोबत वाहतूकीच्या इतर नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन चालकाचा परवाना रद्द होऊ शकतो. परवाना रद्द करण्यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 19 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नियम 19 अन्वये चालकावर कारवाई केली जाईल. (हेही वाचा, धक्कादायक : रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, ब्लँकेट, टॉवेल असे तब्बल 14 कोटींचे सामान चोरीला)

देशातील अपघातांमध्ये होत अललेले मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतील याबाबत आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय रस्तासुरक्षा समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. एम. राधाकृष्णन हे या समितीचे अध्यक्ष आहेत.  या समितीची दिल्लीत नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीत वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली गेली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे प्रमाण कमी असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यानंतर समितीने सरकारला चालकाचा परवाना रद्द करण्याबाबत निर्देश देण्याचे आदेश दिले.