Nana Patole On Ram Temple: INDIA आघाडी लोकसभा निवडणूक जिंकल्यास राम मंदिराचे शुद्धीकरण करू; नाना पटोले यांचे वादग्रस्त वक्तव्य

इंडिया ब्लॉक सत्तेत आल्यानंतर चार शंकराचार्यांच्या हस्ते राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल, असं वादग्रस्त विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

Nana Patole | Twitter

Nana Patole On Ram Temple: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) काही दिवस आधी राम मंदिराचे उद्घाटन झाले. मात्र, अभिषेक सोहळ्यापूर्वी विरोधी पक्षांकडून वादग्रस्त विधाने करण्यात आली. विरोधी पक्षांकडून मंदिराचे उद्घाटन नियमानुसार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राम मंदिराचे (Ram Temple) उद्धाटन हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. आता पुन्हा एकदा मंदिराबाबत नवा वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे सर्वेसर्वा नाना पटोले (Nana Patole) यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंडिया ब्लॉक सत्तेत आल्यानंतर चार शंकराचार्यांच्या हस्ते राम मंदिराचे शुद्धीकरण केले जाईल, असं वादग्रस्त विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

नाना पटोले यांनी पुढे बोलताना सांगितलं की, पंतप्रधान मोदींनी मंदिराच्या बांधकामात प्रोटोकॉलच्या विरोधात काम केले. मंदिरात राम दरबाराची स्थापना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपला मुद्दा स्पष्ट करताना नाना पटोले म्हणाले की, हे मी म्हणत नाही. चार शंकराचार्यांनीदेखील योग्य विधी पाळले नाहीत, असे सांगितलं होतं. (हेही वाचा -Nana Patole On MVA Seat Allocation: काँग्रेसमध्ये 18-19 जागांवर चर्चा, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीनंतर उमेदवार जाहीर करणार- नाना पटोले)

शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व विधी करू. आपल्या सनातन धर्मात घरातील आई-वडिलांपैकी कोणाचेही निधन झाले तर शुद्धीकरणासाठी मुंडण केले जाते. पण, नरेंद्र मोदींनी तसे न करता रामलल्लाला अभिषेक केला आहे. आमच्या शंकराचार्यांनीही याला विरोध केला आहे. तिथे राम दरबार स्थापन करण्याचा आमचा संकल्प आहे, आता देशातील जनतेने हे मान्य केले आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीचा वापर केला आहे. (हेही वाचा -Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात, काँग्रेस नेत्यांकडून गंभीर आरोप)

अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी 11 दिवसांचा विशेष विधी केला होता. त्यादरम्यान ते जमिनीवर झोपले होते. तसेच त्यांनी केवळ फळे आणि नारळ पाणी प्यायले. यापूर्वी पीएम मोदींनी महाराष्ट्रातील काळाराम मंदिर, आंध्र प्रदेशातील वीरभद्र मंदिर, गुरुवायूर मंदिर आणि केरळमधील त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिर आणि तामिळनाडूमधील रंगनाथस्वामी मंदिरातही पूजा केली होती. उत्तराखंडच्या शंकराचार्यांनी राम मंदिर अपूर्ण असल्याचे वर्णन केल्याने हा वाद निर्माण झाला होता. मूर्तीचा अभिषेक अपूर्ण मंदिरात करू नये, असं ते म्हणाले होते.