COVID-19 ची तिसरी लाट मागील 2 लाटांच्या तुलनेत अधिक भयावह असेल? मुंबई, पुणे साठी अलर्ट

COVID 19 | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात कोरोना संकटाच्या दोन लाटा भयावह रूपात प्रशासन, सरकार आणि नागरिकांनी पाहिल्यानंतर आता तिसर्‍या लाटेच्या (COVID 19 Third Wave) शक्यतेवर खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची तिसरी लाट येत्या काही महिन्यात येऊ शकते असा अंदाज आहे. कालच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत 4355 नवे रूग्ण आणि 119 मृत्यू नोंदवले गेले आहेत. राज्यातील वाढती रूग्णसंख्या चिंताजनक असली तरीही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) मात्र सध्या तो धोका नसल्याचं म्हटलं आहे. नीती आयोगाच्या पत्रावरून तिसर्‍या लाटेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे पण टोपेंनी नीती आयोगाचं पत्र जून 2021 मधील असल्याचं देखील स्पष्ट केले आहे. देशातील नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार? नीति आयोगाने दिले हे उत्तर.

सार्वजनिक स्वास्थ्य विभाग (Public Health Department) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तिसरी लाट आली तर या काळात 60 लाख रूग्ण समोर येऊ शकतात आणि त्यामधील सर्वाधिक रूग्ण हे मुंबई, पुणे शहरातील असू शकतील. राज्य आरोग्यमंत्र्यांनी आपण तिसर्‍या लाटेचा अंदाज घेत असल्याचंही सांगितलं आहे.  नक्की वाचा: Corona Vaccination: आता WhatsApp वर बुक करू शकता कोरोना विषाणू लसीचा स्लॉट, अशी करता येईल नोंदणी.

मुंबई मध्ये दुसर्‍या लाटे दरम्यान 11 मार्च दिवशी सर्वाधिक 91,100 रूग्ण समोर आले होते.त्यामुळे तिसर्‍या लाटेत धोका बळावला तर स्थिती गंभीर होऊन संक्रमितांचा आकडा 1.36 लाखांच्या जवळ जाऊ शकतो असा अंदाज आहे. पुण्याचा विचार करता 19 मार्च दिवशी संक्रमण पीक वर असताना 1.25 लाख रूग्ण समोर आले होते. त्यामुळे पुण्यात तिसर्‍या लाटेदरम्यान पीक वर असताना रूग्णसंख्या 1.87 लाख असू शकते. असा अंदाज आहे.

मुंबई,पुणे प्रमाणे ठाण्यात पीक डे दिवशी दुसर्‍या लाटेत रूग्णसंख्या 86,732 होती. ही तिसर्‍या लाटेत 1.3 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. नागपूरातही तिसर्‍या लाटेत रूग्णसंख्या 1.21 लाख असण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अद्याप सरकारने सरसकट निर्बंध उठवलेले नाही. लस घेतलेल्या आणि न घेतलेल्यांनाही या काळात कोविड नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत.