IAS Officer Sudhakar Shinde Dies Due To COVID-19: आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यातील रुबी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सर्व सामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे दिसत आहेत.

Sudhakar Shinde (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सर्व सामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे दिसत आहेत. यातच त्रिपुरा येथील वित्त विभागाचे सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व कोषागार संचालक पदाचा अतिरिक्त पदभार असलेले सुधाकर शिंदे (Sudhakar Shine) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुधाकर शिंदे यांच्यासारख्या तरुण अधिकार्‍यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सुधाकर शिंदे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या उमरा येथील रहिवाशी आहेत. सुधाकर शिंदे हे दोन आठवड्यांपूर्वी आपली पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसह 18 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या गावी आले होते. मात्र, गावातच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेडच्या गुरूगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Thane Unlock: 10 ऑक्टोबर पासून ठाण्यातील हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट आणि बार सकाळी 7 ते रात्री 11.30 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

ट्विट-

महाराष्ट्रात शुक्रवारी 12 हजार 134 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 302 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णांची एकूण संख्या 15 लाख 6 हजार 18 वर पोहचली आहे. यांपैकी 39 हजार 732 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 लाख 29 हजार 339 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 2 लाख 36 हजार 491 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.