शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवार मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे- खासदार अमोल कोल्हे

अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

Dr. Amol Kolhe | (Photo Credits: Facebook)

"शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान तर अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री पदी बसलेलं पाहायंच आहे," असं जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr. Amol Kolhe) यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांच्या पाठिशी ताकद उभी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले. पिंपरी चिंचवडी (Pimpri Chinchwad) मधील भोसरी (Bhosari) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, "पिंपरी चिंचवडसाठी अजित दादांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्याकडून आता अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. त्यांचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे. त्यांच्या नेतृत्वाला बळ दिलं पाहिजे."

शरद पवार यांच्याविषयी बोलतानो कोल्हे म्हणाले की, "पवार साहेब देखील पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालत आहेत. त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे, ही भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना जर देशाच्या पंतप्रधान पदी पाहायचं असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालायला लागू नये, असं काम आपण करायला हवं. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण साहेबांना दाखवून दिली पाहिजे." (हे ही वाचा: Amol Kolhe: 'श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्यावी' मंदीर उघडण्याचा श्रेयवादावरून अमोल कोल्हे यांचा भाजपला टोला)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेनेचा मेळावा झाला. यावेळी खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली. 'राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेना सर्वांच्या वर आहे. अजित पवारांना शिवसैनिकांचं ऐकावंच लागेल,' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अमोल कोल्हे यांचे हे वक्तव्य म्हणजे राऊत यांना दिलेले उत्तर आहे, असे बोलले जात आहे.