'अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याबाबत मी काहीही चुकीचे बोललो नाही'; वादानंतर Sudarshan Chowdhury यांचे स्पष्टीकरण (Video)
याबाबत पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर म्हणतात, ‘पुणे भाजपचे नेते सुदर्शन चौधरी यांनी देवेंद्रजींना सांगावे की, अजित पवार यांना महायुतीतून काढावे ही त्यांची मागणी आहे. असे कोणी म्हणेल तेव्हा याकडे लक्ष देऊ नये.’
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या (NCP) आघाडीवरून महाराष्ट्रातील भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली असल्याचे दिसत आहे. नुकतेच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी (Sudarshan Chowdhury) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडीतून वगळण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. याबाबत सुदर्शन चौधरी यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर आता सुदर्शन चौधरी यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आपण काहीही चुकीचे बोललो नसल्याचे सांगितले.
सुदर्शन चौधरी म्हणाले होते. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यासोबत युती करून सत्तेत राहण्यापेक्षा भाजपचे कार्यकर्ते सत्तेतून बाहेर पडतील. पुणे जिल्ह्याला स्वाभिमानी नेतृत्व मिळत नाही. पुणे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले आहेत. ज्या राष्ट्रवादीचा आम्ही गेल्या 10 वर्षांपासून विरोध करतोय, त्या राष्ट्रवादीचे अजित दादा तुम्ही आमच्या बोकांडी दिले आहेत. कार्यकर्ते अक्षरश: भीतीच्या छायेत आहेत. तिथे अजित दादांनी पालकमंत्री व्हायचे, बॉस बनून आम्हाला आदेश द्यायचे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करायचे, आम्हाला असली सत्ता नको.’
पहा पोस्ट-
चौधरी यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याबाबत पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर म्हणतात, ‘पुणे भाजपचे नेते सुदर्शन चौधरी यांनी देवेंद्रजींना सांगावे की, अजित पवार यांना महायुतीतून काढावे ही त्यांची मागणी आहे. असे कोणी म्हणेल तेव्हा याकडे लक्ष देऊ नये.’ (हेही वाचा: 'Ajit Pawar आमच्या बोकांडी, त्यांना महायुतीतून बाहेर काढा', पुणे BJPमध्ये खदखद)
याबाबत स्पष्टीकरण देताना सुदर्शन चौधरी म्हणतात, ‘मी यापूर्वी व्यक्त केलेले मत माझे वैयक्तिक मत होते आणि पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मी काहीही चुकीचे बोललो नाही. अजितदादांच्या समर्थकांनी येथे ज्या प्रकारे गोंधळ घातला, ती त्यांची संस्कृती आहे. यावर मला काहीही बोलायचे नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, मी अजित पवारांबद्दल काही चुकीचे बोललो आहे, तर मी या सर्व वादात पडू इच्छित नाही.’