एप्रिल फूलच्या निमित्ताने कोरोनासंबंधित अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई केली जाणार; महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नागरिकांना स्पष्ट इशारा
महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधीत (COVID19) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढली होती. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधीतांचा आकडा 230 वर पोहचला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे.
महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधीत (COVID19) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढली होती. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधीतांचा आकडा 230 वर पोहचला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. याच पाश्वभूमीवर खोट्या माहितीचा प्रसार केला जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. यातच 1 एप्रिलच्या निमित्ताने (April Fools day jokes) कोरोनाबाबत खोट्या माहितीचा प्रसार केल्यास, संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी नागरिकांना दिले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 33 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काहीवेळापूर्वीच एका ट्विटच्या माध्यमातून नागरिकांना सूचक इशारा दिला आहे. एप्रिल फूल करण्यासाठी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. आज 31 मार्च आहे. उद्या एक एप्रिल आहे. यादिवशी अनेकजण आपल्या सहकारी, मित्रांशी चेष्टा करतात. परंतु, आज महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोना विषाणूशी लढा देत आहे. अशा परिस्थितीत एप्रिल फूलच्या निमित्ताने कोरोनासंबंधित कोणत्याही प्रकारची अफवा, कोणतीही प्रकारची मस्करी करू नये, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. याशिवाय, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांच्यासह सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात; राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
अनिल देशमुख यांचे ट्वीट-
एप्रिल फुलमध्ये कोरोना विषाणू संबंधित चुकीचे मेसेज पाठवल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नसल्याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात ग्रुप ॲडमिनने आताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना याबाबत सूचना द्याव्यात. त्याचबरोबर सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल, अशी सेटिंग करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. “कोरोना विषाणू संदर्भात व्हॉट्स्अॅपवर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. त्यामुळे अनेक अफवा पसरल्या जात आहेत. असे मेसेज पाठवणाऱ्यांना अटक आणि दंडाची शिक्षा असल्याचे पुण्याचे सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे म्हणाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)