Hussain Dalwai Passes Away: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हुसैन दलवाई यांच मुंबईत निधन
हुसैन दलवाईंनी 1977-78 अशा वर्षभरासाठी महाराष्ट्र राज्याचे कायदामंत्री पद भूषवलं आहे.
रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी खासदार हुसैन भाई दलवाई (Hussain Dalwai) यांचे काल (16 मे) निधन झाले आहे. मुंबईत दीर्घ आजारपणात त्यांनी वयाच्या 99 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. खासदारकी प्रमाणेच दलवाई यांनी महाराष्ट्रात माजी कायदामंत्री म्हणून देखील काम केले आहे. हुसैन दलवाई यांनी विधानसभेतही खेड म्हणून 1962-78 असा मोठा काळ आमदार होते.
दलवाईंनी 1977-78 अशा वर्षभरासाठी राज्याचे कायदामंत्री पद भूषवलं आहे. 1984 साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. नंतर वसंतदादा पाटील यांनी 1984 साली त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा हट्ट केल्याने राज्यसभेची खासदारकी सोडून ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आणि खासदार झाले. हे देखील नक्की वाचा: Shiv Sena MLA Ramesh Latke Passes Away: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रोहित पवार ट्वीट
दलवाई यांचा जन्म आणि शिक्षण चिपळून मध्ये झाले मुंबईत त्यांई वकिलीचं शिक्षण घेतलं. मराठी, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्त्व होते. हुसेन दलवाई यांच्या पश्चात मोठा मुलगा दिलावर, फिरोज, मुश्ताक आणि रेहाना, शहनाज या दोन मुली आहेत.