Husband Wife Into Well: बायको विहीरीत ढकलली, पोहत काठाला आली; त्याने उडी मारुन पुन्हा बुडवली

तक्रारीनुसार सिद्धाराम कारंडे याने पत्नी सोनाली हिस विहीरीत ढकलले. तिला पोहता येत होते. ती पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, सिद्धराम यानेही विहीरीत उडी घेतली आणि तीला पाण्यात बुडवले. घडल्या प्रकारामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते आहे.

Well | Representational image (Photo Credits: pxhere)

Husband Wife Dies In Well at Gherdi in Sagola Taluka: सोलापूर येथील एका जोडप्याचा विहीरत बुडून मृत्यू झाला आहे. सिद्धाराम सुभाष कारंडे (वय-28 वर्षे) तर सोनाली सिद्धाराम कारंडे (वय-25 वर्षे) अस दोघांची नावे आहेत. दोघेही मेटकरवाडी, घेरडी तालूका सांगोला येथील राहणारे आहेत. सिद्धाराम कारंडे हा मद्यपी होता. त्याला दारुचे प्रचंड व्यसन होते. नशेच्या भरात त्याने पत्नीला विहिरीत ढकले. मात्र, ती पोहून काठाला येत होती. इतक्यात त्यानेही विहीरीत उडी घेतले आणि तिला बुडवले. ज्यामुळे दोघांचाही करुण अंत झाला आहे.

सांगोला पोलिसांनी लक्ष्मण बाबू आलदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार सिद्धाराम कारंडे याने पत्नी सोनाली हिस विहीरीत ढकलले. तिला पोहता येत होते. ती पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, सिद्धराम यानेही विहीरीत उडी घेतली आणि तीला पाण्यात बुडवले. घडल्या प्रकारामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते आहे. (हेही वाचा, Dugarwadi Waterfall (Nashik) News: जरा जपून! दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून, त्र्यंबक येथील घटना)

लक्ष्मण बाबू आलदर (रा. मेटकरवाडी, घेरडी ता. सांगोला) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मेहुण्याचा मुलगा हा त्यांच्या घराशेजारी राहात होता. सिद्धाराम सुभाष कारंडे असे त्याचे नाव. पत्नी सोनाली, तीन मुली आणि आजी यांंच्यासह तो शेजारीच राहात होता. 13 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोनाली ही शेतात गेलेली दिसली. दरम्यान, सिद्धाराम हासुद्धा तिच्या पाठोपाठ शेतात गेला. तो शेतात गेला त्या वेळी प्रचंड दारु प्यायला होता. त्यांच्यात काहीतरी वाद झाला असावा असे लक्षात आल्याने आपणही त्यांच्या पाठी गेलो.

सिद्धाराम हा सोनालीला विहीरीजवळ मारहाण करत होता. त्याने तिला विहीरीत ढकलले. लक्ष्मण आलदर यांनी पुढे म्हटले आहे की, सोनाली हीस पोहता येत होते. तिच्यापाठोपाठ मिही विहीरत उतरलो. तिला पाण्याबाहेर काढत असताना सिद्धाराम यानेही पाण्यात उडी मारली आणि सोनालीचा पाय पकडून तिला विहिरीत पाण्यात ओढले.