घृणास्पद! विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरुन नव-याने आपल्या 7 वर्षांच्या मुलासमोर पत्नीची डोकं ठेचून केली हत्या
या आरोपीचे नाव संतोष यादव असे आहे. हा खून करुन आरोपी उत्तर प्रदेशात आपल्या गावी निघाला होता. त्यावेळी पोलिसांना सापळा रचून त्याला अटक केली.
माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुंबईत (Mumbai) उघडकीस आली आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे. विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरुन 42 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचे डोकं ठेचून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे या आरोपीने हा सर्व प्रकार त्याच्या 7 वर्षाच्या मुलासमोर केला. या आरोपीचे नाव संतोष यादव असे आहे. हा खून करुन आरोपी उत्तर प्रदेशात आपल्या गावी निघाला होता. त्यावेळी पोलिसांना सापळा रचून त्याला अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये कायम वाद, भांडणं होत असत. संतोषला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. काल त्यांच्यातला वाद टोकाला गेला आणि संतोषने आपल्या बायकोचं डोकं दगडाने ठेचून तिथून पळ काढला. ही सगळी घटना या दोघांच्या सात वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांसमोर घडत होती. त्याचे वडील तिथून पळून गेल्यानंतर त्या मुलाने रस्त्यावरच्या लोकांना बोलावलं आणि मग त्यापैकीच एकाने पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.हेदेखील वाचा- मुंबईतील दगडी चाळ होणार इतिहासजमा, म्हाडा उभारणार 40 मजली टॉवर
त्यानंतर भायखळा पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या महिलेला रुग्णालयात हलवलं. मात्र, जखमांची तीव्रता अधिक असल्याने ती वाचू शकली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस अदिक तपास करत आहेत.
दरम्यान चंद्रपूरातील (Chandrapur) राजुरा तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधी गावातील एक शेतक-याची त्याच्याच 18 वर्षाच्या मुलाने हत्या करुन त्याचा मृतदेह रेल्वे रुळामध्ये फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिरूपती तातोबा धानोरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी विरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अवघ्या 8 तासात खुनाचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे. आरोपी निखिल धानोरकर याला अटक करण्यात आली असून या गुन्ह्यात त्याला मदत करणा-या त्याच्या मित्रास देखील अटक करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2021 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

