पुत्रप्राप्ती साठी काळ्या जादूने उपाय म्हणून पत्नीला धबधब्या खाली विवस्त्र होत आंघोळ करण्याची हट्ट करणारा पती अटकेत; अन्य 3 जणांनाही बेड्या

2013 सालापासून पीडीतेला सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याचं तिने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. मुलगा न झाल्याने आणि हुंडा न दिल्याने हा त्रास दिला जात असल्याचं सांगण्यात आले आहे.

पुत्रप्राप्ती साठी काळ्या जादूने उपाय म्हणून पत्नीला धबधब्या खाली विवस्त्र होत आंघोळ करण्याची हट्ट करणारा पती अटकेत; अन्य 3 जणांनाही बेड्या
Black Magic | (File Photo)

मुलगा होईल या आशेपायी एका 38 वर्षीय व्यावसायिकाने आपल्या पत्नीला सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होऊन आंघोळ करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही गोष्ट रत्नागिरीच्या मालेश्वर धबधब्याजवळ घडली आहे. हा उपाय त्यांना एका बुवाने काळ्या जादूच्या माध्यमातून सांगितला असल्याचं मीडीया रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे.

दरम्यान महिलेने तक्रार नोंदवताच संबंधितांवर जादुटोणा प्रबंधक कायदा आणि आयपीसी च्या कलमांनुसार रविवारी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. या प्रकरणी पीडितेचा पती, त्याचे आई वडील आणि मांत्रिक यांना अटक झाली आहे.

2013 सालापासून पीडीतेला सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याचं तिने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. मुलगा न झाल्याने आणि हुंडा न दिल्याने हा त्रास दिला जात असल्याचं सांगण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या जयसिंगपूर मध्ये सासरची मंडळी पीडितेला घेऊन गेली. आंबेगाव बुद्रुकच्या घरी आणि आकुर्डी, शिरोळ,सुरवड या कार्यालयात त्यांनी काही पूजा केल्या. नंतर धबधब्या खाली पीडीतेला कपडे काढून स्नान करण्यासाठी पतीने हट्ट केला. त्यांची अशी धारणा होती असं केल्यास त्यांना पुत्रप्राप्ती होऊ शकते.

पतीने पीडीत पत्नीला फसवून तिचे दागिने घेऊन आणि खोटी सही घेऊन 75 लाखांचे कर्ज घेतले आहे. यासोबतच तिच्या काही संपत्तीचाही वापर केला आहे. दरम्यान पोलिसांनी कलम 498,323,420,504,406, अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच जादूटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही पोलिसांनी कारवाई केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2022 11:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).