Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात बारावीच्या परिक्षेला सुरूवात झाली असून पुन्हा प्रश्नपत्रिका फुटल्याची (HSC Exam Paper Leak) धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा प्रकार जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूरमध्ये (Partur) उडघकीस आला आहे. याप्रकरणी एका शिक्षकासह आठ जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरू आहे. या घटनेतील हा शिक्षक जवळच्या झेरॉक्स सेंटर चालकाला व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका पाठवत होता. तसेच तिथून काही जणांचा गट विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम करायचा. बारावीची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवरुन बाहेर पाठवल्या जात असल्याची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी निलेश तांबेंसह परतूर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पेपर फोडल्याप्रकरणी 8 जणांच्या विरोधात परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परतूर तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

बारावीच्या परिक्षेला नुकतीच सुरूवात झाली असून पुन्हा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, पेपर फुटी प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच जालना येथे घडलेल्या प्रकाराने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. परतूर तालुक्यातील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातून बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवरुन बाहेर पाठवल्या जात असल्याचे माहिती पोलिसांना कळाली. तसेच यात एका शिक्षकाचा समावेश असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी शिक्षकासह 8 जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरु असताना हॉल क्रमांक 20 वरील पर्यवेक्षकासमोरच या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढले. बारावीच्या हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका बाहेर आणून त्याची उत्तरे लिहिली गेली. त्यानंतर झेरॉक्स मशीनमध्ये त्याच्या प्रति काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Maharashtra Board Exam 2020 Date Sheet and Timetable: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादंवी 188 कलम 5, 6, 7 महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड गैरव्यवहार प्रतिबंध अनव्ये गुम्हा दाखल झाला असून शिक्षकासह आठ जणांना परतूर ताब्यात घेतले आहे. कृष्णा साळूदात चव्हाण (वय19), दिनेश अंकुशराव तेलगड (वय 34), रामेश्वर बाबासाहेब उबाळे (वय 22), विषवभर शंकरराव पाष्टे (वय 19), श्याम दत्तात्रय उबाळे (वय 19), शुभम सुधाकर मुळे (वय 18), ज्ञानेश्वर सूंदरराव माने (वय 18) यांच्यासह परीक्षा हॉल क्रमांक 20 च्या पर्यवेक्षकालाही अटक करण्यात आली आहे.