बारावी बोर्ड परिक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी विद्यार्थ्यांना 400 रुपये मोजावे लागणार?
मात्र यंदा विज्ञान (Science) शाखेच्या निकालात घट झाल्याने विद्यार्थी परिक्षेच्या उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी देण्यासाठी पुढे आले आहेत.
नुकताच बारावी बोर्ड परिक्षेचा (HSC Board Exam) निकाल जाहीर झाला. मात्र यंदा विज्ञान (Science) शाखेच्या निकालात घट झाल्याने विद्यार्थी परिक्षेच्या उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी देण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र विद्यार्थ्यांना उत्तरप्रत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी 400 रुपये मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण कमी देण्यात आले आहेत की लेखी परिक्षेत कमी गुण मिळाले असल्याचे शिक्षण मंडळाला विचारले. मात्र त्यांच्याकडे याबद्दल कोणतेही उत्तर नसल्याचे पालकांनी सांगितले आहे. त्याचसोबत यंदा शिक्षण मंडळाकडून परिक्षा पद्धतीत बदलाव केल्यामुळे विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.(Maharashtra Board 12th Std Results 2019: 12 वीचा निकाल SMS च्या माध्यामातून BSNL, Tata, Vodafone युजर्स कसा पाहू शकाल?)
त्याचसोबत मुंबई मधील एका महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील बारावी बोर्ड परिक्षेसाठी बसलेल्या 40 विद्यार्थ्यांना नापास झाल्याचा शेरा देण्यात आला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत असून पुनर्मूल्यांकनसाठी उत्तरपत्रिका देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. परंतु शिक्षण मंडळाकडूनसुद्धा या प्रकारावर कोणतेही उत्तर आलेले नसल्याचे पालकांनी म्हटले आहे.