80 वर्षीय शरद पवारांच्या चाणक्यनीती ने 'असे' बदलले महाराष्ट्रात सत्ता समीकरण; देवेंद्र फडणवीसांसह संपूर्ण भाजपला केले नेस्तनाभूत

23 नोव्हेंबरला झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर असे वाटले की, अजित पवारांनी असे धाडसी पाऊल उचलण्यामागे शरद पवारांचाच हात असेल. मात्र असे काही नसून आपले अजित पवारांना समर्थन नाही असे शरद पवारांनी ट्विट करत सांगितले. चला तर मग पाहूया कशी पलटवली शरद पवारांनी ही बाजी?

Sharad Pawar | (Photo Credits: twitter)

महाराष्ट्रातील राजकारणात मागील आठवड्यात झालेला बदल हा राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारा होता. मतदारांना कल्पनाही नव्हती की अजित पवार हे भाजपशी हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. या संपुर्ण घटनाक्रमावर करडी नजर ठेवून असलेले शरद पवारांनी  (Sharad Pawar) आपल्या चाणक्यनीतीचा वापर करत देवेंद्र फडणवीसांची घाईघाईत बनवलेली सरकार मोडून काढली आणि आपल्या भाच्याची अजित पवारांशी घरवापसी केली. शरद पवारांच्या या चाणक्यनीतीने भाजपच्या मनसुब्यांवर अक्षरश: पाणी सोडले.

23 नोव्हेंबरला झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर असे वाटले की, अजित पवारांनी असे धाडसी पाऊल उचलण्यामागे शरद पवारांचाच हात असेल. मात्र असे काही नसून आपले अजित पवारांना समर्थन नाही असे शरद पवारांनी ट्विट करत सांगितले. चला तर मग पाहूया कशी पलटवली शरद पवारांनी ही बाजी?

ट्विट आणि पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले चित्र:

शनिवारी जशी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शपथविधीची बातमी समोर आली त्यावेळी ताबडतोब शरद पवारांनी ट्विट करत हा पक्षाचा निर्णय नाही असे स्पष्ट केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंसह पत्रकार परिषद घेत आपली पार्टी शिवसेना आणि काँग्रेससह आहे असे सांगितले. यामध्ये 3 आमदार असे होते ज्यांना अंधारात ठेवून राजभवनात शपथविधीसाठी आणले होते. तसेच शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, जो कोणी आमदार विरोध करेल त्यांना पक्षांतर बदली कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. कारवाई नंतर आमदारांना पुन्हा निवडणूक लढावी लागेल आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निवडणूक लढवेल आणि त्यांना हरविण्याचा प्रयत्न करेल.

उदयनराजे यांचा पराभव:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांसह साता-यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूकसुद्धा झाली होती. ही निवडणूक उदयनराजे भोसले यांच्या पक्षबदलामुळे घेण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता आणि त्यांनी सारी शक्ती पणाला लावून उदयनराजे यांना पराभूत केले. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात झाला मोठा बदल; 28 नोव्हेंबर ला शिवतीर्थावर घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवारांचे छाटले पंख:

शरद पवारांनी आपल्या पक्षातील बड्या नेत्यांसोबत बैठक घेऊन अजित पवारांना विधिमंडळ नेत्यांच्या पदांवरून हटवले आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ही जबाबदारी सोपवली. त्यामुळे अजित पवारांचा व्हीप देण्याचा अधिकार सुद्धा संपुष्टात आला. त्यामुळे जे आमदार बंड पुकारण्याच्या तयारीत होते त्यांचे धाबेही चांगलेच दणाणले असतील.

अन्य आमदारांना पुन्हा आणले:

महाराष्ट्रातील धुरंधर राजकारणी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या शरद पवारांनी आपल्या सर्व नॉट रिचेबल झालेल्या आमदारांशी संपर्क केला आणि आपल्या पक्षात पुन्हा आणले. यात त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस या दोघांचीही मदत घेतली. कोणीही बंड पुकारू नये यासाठी सर्वांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले. महराष्ट्रातून देशाच्या परिवर्तनाची सुरुवात झाली, शिवसेनेचं सूर्ययान दिल्लीतही लँड होईल: संजय राऊत

धनंजय मुंडेंचे एकत्र येणे:

धनंजय मुंडे आपल्या काकांसोबत एकत्र येणे हे अजित पवारांसाठी धक्कादायक होते. कारण ते अजित पवारांसोबत जास्त जवळचे होते.

आमदारांची परेड:

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या आमदारांची परेड कोणी घेतली याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र त्यानंतर भाजप समजून गेले की आपल्याकडे पुरेसे संख्याबल नाही.

सर्वोच्च न्यायालयात जाणे:

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा गेमचेंजर ठरला. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फ्लोर टेस्टचा आदेश दिला आणि फडणवीसांकडे तेवढे संख्याबळ न असल्या कारणाने त्यांनाही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्याशिवाय शरद पवार नेहमी अजित पवारांच्या संपर्कात राहिले. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कुटूंबातील लोक त्यांच्या संपर्कात राहिले. असेही सांगितले जातय की शरद पवार स्वत: अजित पवारांना भेटले ज्याने कदाचित अजित दादांचे मतपरिवर्तन झाले असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now