Aurangabad Accident: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ ट्रक आणि क्रूझर यांच्यात जोरदार धडक झाली. या जोरदार धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सात जण जखमी झाले.

Accident Representational image (PC - PTI)

Aurangabad Accident: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. टीव्ही 9 मराठी ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, ट्रक आणि क्रूझर वाहनात हा अपघात झाला. यातील प्रवासी लग्नासाठी निघाले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला केला. या घटनेमुळे कन्नड शहरात एकचं खळबळ उडाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताचं कन्नड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ ट्रक आणि क्रूझर यांच्यात जोरदार धडक झाली. या जोरदार धडकेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सात जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (वाचा - MP Bus Accident: मध्य प्रदेशात कालव्यात बस पडून अपघाताप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मृतांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून 3 जणांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. हे तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्‍यात किनगावजवळ रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 15 मजुरांमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि दोन बालकांचा समावेश होता.