यापुढे निवडणूक लढविणार नाही - बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

आज हितेंद्र ठाकूर यांनी आगामी निवडणूकीमध्ये मतदान करणार नसल्याची घोषणा केली आहे.

Hitendra Thakur | Facebook

बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर यांनी आज ( 22 ऑक्टोबर) दिवशी केलेल्या एका मोठ्या घोषणेमुळे राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. आज हितेंद्र ठाकूर यांनी आगामी निवडणूकीमध्ये मतदान करणार नसल्याची घोषणा केली आहे. मात्र हा राजकीय संन्यास नसेल केवळ निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये तिकीट जाहीर केले होते. त्यांच्या राजकीय प्रवेशानंतर 90च्या दशकामध्ये राजकारणामध्ये गुन्हेगारीकारण होत असल्याचा आरोप झाला होता.

हितेंद्र ठाकूर हे वसईमधील राजकीय क्षेत्रातील मोठं प्रस्थ आहे. हळूहळू त्यांचा प्रभाव कमी झाला. दरम्यान आरोपप्रत्यारोपांच्या फैरीमध्ये निवडणूक चांगलीच गाजली होती. प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर पोलिस सेवेमध्ये असलेल्या प्रदीप शर्मा यांच्यावरही एन्काऊंटरवरून आरोप करण्यात आले आहेत.

प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर आरोप करताना त्यांची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांच्यासोबत केली आहे.