Sambhaji Bhide Controversial Statement: 'निर्लज्ज लोकांचा देश त्याचं नाव हिंदुस्तान', संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

'निर्लज्ज लोकांचा देश त्याचं नाव हिंदुस्तान' अशा शब्दात संभाजी भिडे (Sambhaji Bhide Controversial Statement) यांनी चक्क देशाविषयी उद्गार काढले आहेत.

Sambhaji Bhide | (Photo Credit: Facebook)

शिवप्रतिष्ठान (Shiv Pratishthan) संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 'निर्लज्ज लोकांचा देश त्याचं नाव हिंदुस्तान' अशा शब्दात संभाजी भिडे (Sambhaji Bhide Controversial Statement) यांनी चक्क देशाविषयी उद्गार काढले आहेत. सांगली येथे दुर्गामाता दौड समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बोलतान भिडे यांनी म्हटले की, 'पारतंत्र्य, गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा हा देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे', असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.

काय म्हणाले संभाजी भिडे?

''निर्लज्ज लोकांचा देश त्याचं नाव हिंदुस्थान. जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश. मग आपला, देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार? तो क्रमांक एक आपण मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत? लोकसंख्येमध्ये आपल्याला जमलं नाही आपलं कारण, चीन पुढे आहे. जो आपला कट्टर दुश्मन, वैरी, मारेकरी, गनीम, कर्दनकाळ, शत्रू आहे. पण हिंदूना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे. कशात? निर्लज्जपणात! जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा वाटत नाही, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज 23 कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घ काळ.. परक्यांचा मार खात, परक्यांचं दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे'', असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sambhaji Bhide: कोरोना व्हायरस संसर्गामुळे मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे)

कोरोना हा काल्पनिक आहे-  भिडे

दरम्यान, ''कोरोना हा काल्पनिक आहे. कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे'', अशा शब्दात संभाजी भिडे यांनी कोरोनाबद्दलही आपले वादग्रस्त विचार पुन्हा एकदा प्रकट केले आहेत.

व्हिडिओ

संभाजी भिडे यांनी या आधीही अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. अंबा आणि गर्भधारणा, कोरोना हा केवळ गा*डू लोकांना होणारा आजार आहे, यांसारखी अनेक वादग्रस्त विधाने या आधी भिडे यांनी केली आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif