Nitin Gadkari On Hindu Temples: भारतातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नाही; नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य
तेथे धर्मशाळा चांगल्या नाहीत. परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद, चर्च यांचे वातावरण पाहून मला वाटले की आपली प्रार्थनास्थळे चांगली असावीत. मला संधी मिळाल्यानंतर मी महाराष्ट्रात 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग बांधला, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
Nitin Gadkari On Hindu Temples: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी देशातील हिंदू मंदिरांबाबत (Hindu Temples) मोठं वक्तव्य केलं. भारतातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते. तेथे धर्मशाळा चांगल्या नाहीत. परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद, चर्च यांचे वातावरण पाहून मला वाटले की आपली प्रार्थनास्थळे चांगली असावीत. मला संधी मिळाल्यानंतर मी महाराष्ट्रात 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग बांधला. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही आपली श्रद्धास्थानं आहेत. ही श्रद्धास्थळ चांगल्या प्रकारे विकसीत करण्यासाठी आम्ही काम करतो आहोत, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.
नितिन गडकरी यांनी पुढे बोलताना सांगितले की, उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून निघणाऱ्या कैलास मानसरोवरच्या मार्गाचे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्वी नेपाळमधून जावं लागायचं आणि या दरम्यान तापमान उणेमध्ये होते. यामुळे खूप त्रास व्हायचा. (हेही वाचा -Savitri Bai Phule यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित, दोन वेबसाइट्सविरुद्ध एफआयआर दाखल)
प्रकल्पांना होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) अचूक बनवण्याची गरज असल्याचंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं. अधिकृत निवेदनानुसार, गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकार्यांसह बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलं आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाच्या विविध पैलूंवर चर्चा केली.
कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या मार्गांवर यावेळी बैठकीत चर्चा झाली. यावेळी गडकरींनी राष्ट्रीय महामार्गांवर कार्यक्षमता वाढवणे आणि 'प्रवास सुलभता' यांवर लक्ष केंद्रित करणारे दोन मोबाइल अॅप्सही लॉन्च केले.