हिंदी राष्ट्रीय भाषा नाही उगाच ती आमच्या माथी लादू नका; मनसेचा इशारा
तामिळनाडू राज्यातून तर या प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर आता या वादात मनसेही देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
नव्या शैक्षणिक वर्षात हिंदी भाषा बंधनकारक करण्यावरुन दक्षिणेतील राज्यात वाद सुरु आहे. तामिळनाडू राज्यातून तर या प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर आता या वादात मनसेही देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदी ही राष्ट्रीय भाषा नसल्याचे मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हणण्यात आले आहे.
मनसे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मनसेची भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की, "हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका."
मनसे अधिकृत ट्विट:
या प्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी देखील आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. तर उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी नागरिकांना आवाहन केले की, शिक्षा नीती मसुद्याबाबात अध्ययन, विश्लेषण आणि चर्चा करा. मात्र यासंदर्भात निर्णय घाईघाईत घेऊन कोणत्याही निष्कर्षावर पोहचू नका.