Heat Stroke: उन्हाळा वाढला आहे, म्हणूनच जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे, उपाय आणि सुरक्षा
म्हणूनच जाणून घ्या उष्माघाताची कारणे (Heat Stroke Causes), लक्षणे (Heat Stroke Symptoms), उपाय (Heat Stroke Remedies) आणि सुरक्षा (Heat Stroke Safety).
What is Heat Stroke: उन्हाळा (Summer) आता चांगलाच वाढला आहे. दररोज वाढणाऱ्या तापमानामुळे अंगातून घामाच्या धारा आणि जीवाची काहीली होऊ लागली आहे. अशा वेळी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. खास करुन उष्माघात या भयानक प्रकारापासून. योग्य आणि आवश्यक उष्माघात (Heat Stroke) ही एक गंभीर आणि संभाव्य जीवघेणा ठरु शकतो. शरीराचे तापमान जेव्हा शरीराचे मुख्य तापमान 104 अंश फॅरेनहाइट (40 अंश सेल्सिअस) वर वाढते तेव्हा उद्भवते. ही वैद्यकीय आणीबाणी मानली जाते आणि त्यावर त्वरित उपचार आवश्यक असतात. म्हणूनच जाणून घ्या उष्माघाताची कारणे (Heat Stroke Causes), लक्षणे (Heat Stroke Symptoms), उपाय (Heat Stroke Remedies) आणि सुरक्षा (Heat Stroke Safety).
उष्माघात हा सामान्यत: उच्च तापमानाच्या संपर्कात दीर्घकाळ आल्याने होतो. ज्यामुळे शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणा (जसे की घाम येणे, त्वचेचा ओलसरपणा निघून जाणे) कार्य सुरळीत काम करत नाही. जाते आणि शरीर त्याचे तापमान प्रभावीपणे नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे उष्माघातासारखी समस्या गंभीर रुप धारण करु शकते. (हेही वाचा, Malegaon Fight Heat Stroke: नाशिक जिल्ह्यात तापमान वाढले, उष्माघाताशी लढण्यासाठी मालेगाव आरोग्य विभाग सज्ज)
उष्माघाताची लक्षणे (Symptoms of Heat Stroke)
- उच्च शरीराचे तापमान (104 अंश फॅरेनहाइट किंवा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त)
- गरम, कोरडी त्वचा (काही प्रकरणांमध्ये, घाम न येणे, ताप येणे अशी लक्षणे )
- हृदयाचे ठोके वाढणे आणि धाप लागणे
- डोकेदुखी, चक्कर येणे आणि मन संभ्रमीत होणे
- मळमळ आणि उलटी
- स्नायू पेटके किंवा अशक्तपणा
- त्वचा, अवयव, ज्ञानेद्रियातील चेतना कमी होणे किंवा कोमात जाणे
उष्माघातापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?
- शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपत्कालीन सेवांवर कॉल करा किंवा ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
- पीडित व्यक्तीला सावलीत किंवा घरातील थंड ठिकाणी ठेवा
- शरीराचे तापमान कमी करण्यासाठी अंगावर शक्य तेवढे कमी कपडे ठेवा
- ओल्या फडक्याने रुग्णाचे अंग पुसून घ्या
- रुग्ण शुद्धीत असल्यास आणि त्याला गिळता येत असल्यास थंड पाणी प्यायला द्या
- वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाचे निरिक्षण करा. लक्षणे नोंदवत राहा
उष्माघातापासून बचाव होण्यासाठी
- सवाधगिरी बाळगा, उन्हात फिरणे टाळा, थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न कराखूप पाणी प्या
- तहाण नसली तरीही खूप पाणी पित राहा
- उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त आहार द्रवरुपात घ्या
- अधिक शारीरिक श्रमाचा व्यायाम, कष्टाची कामे टाळा
- सकाळी किंवा संध्याकाळीच शेतातीलकामे करा. दुपारी घराबाहेर पडणे टाळा
- कमी काचणारे, सैलसर आणि सुती कपडे वापरा.
- अधिक गडद रंगाचे कपडे वापरणे टाळा. सुती सैलसर आणि फिक्या रंगाला प्राधान्यद्या
- लहना मुले, प्राणी यांना बंदिस्त वाहने, खोली यात ठेऊ नका
उष्माघात हे एक गंभीर प्रकरण आहे. ज्यामुळे शरीराच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. रुग्णाला त्वरीत उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. उष्ण वातावरणात किंवा उष्णतेच्या लाटेत सुरक्षित राहण्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत मिळणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.