IPL Auction 2025 Live

Coronavirus: अभिनेता शाहरुख खान याच्याकडून महाराष्ट्राला 25,000 PPE Kits; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मानले आभार

राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'शाहरुख खान खूप खूप आभार, आपण 25,000 पीपीई किटचे योगदान दिले आहे.कोरोना व्हायरस संकटाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला हे प्रदीर्घ काळासाठी तसेच कोरोनाविरुद्धच्या पहिल्या फळीत काम करत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.'

Health Minister Rajesh Tope And Actor Shah Rukh Khan | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस संकटाविरुद्धच्या लढाईत अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने त्याचे आभार मानले आहेत. अभिनेता शाहरुख याने महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 25,000 पीपीई किट (Personal Protective Equipment) दिले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी या योगदानाबद्दल शाहरुख यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. शाहरुख यांची मदत महाराष्ट्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोलाची ठरेल असेही टोपे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'शाहरुख खान खूप खूप आभार, आपण 25,000 पीपीई किटचे योगदान दिले आहे.कोरोना व्हायरस संकटाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला हे प्रदीर्घ काळासाठी तसेच कोरोनाविरुद्धच्या पहिल्या फळीत काम करत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.'

राजेश टोपे ट्विट

महाराष्ट्र सरकार कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत सातत्याने पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लब्ज यांसारख्या संसाधनांच्या कमतरतेमुळे संघर्ष करत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लब्ज यांसारख्या सुरक्षा पुरवणाऱ्या साधनांची उपलब्धता करुन देण्याबाबत मागणी केली होती. (हेही वाचा,Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; जाणून घ्या एका क्लिकवर )

शाहरुख खान ट्विट

दरम्यान, राजेश टोपे यांच्या ट्विटला अभिनेता शाहरुख खान यांनी उत्तरही दिले आहे. ट्विटमध्ये शाहरुखने म्हटले आहे की, हे किट मागविण्यासाठी आपण जी मदत केली त्याबाबत मी आपला आभारी आहे. या प्रयत्नात आपण सर्वजण मानतेचा दृष्टीकोन ठेऊन एकमेकांसोबत आहोत. मला आनंद आहे की, सेवा करण्याची संधी मिळाली. आपला परिवार आणि आपली टीम सूरक्षीत आणि आरोग्यदाई राहो.