Pune Kidney Racket: आरोग्य विभागाकडून Ruby Hall Clinic विरूद्ध कारवाई; Organ Transplant चा परवाना निलंबित
त्यामध्ये अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला आपली पत्नी म्हणून दाखविलेली कागदपत्रे आणि त्यांच्या विवाहाचे खोटे पुरावे ग्राह्य धरून ससून हॉस्पिटलने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली होती.
पुण्यामध्ये मंगळवारी (12 एप्रिल) आरोग्य विभागामे कारवाई करत रूबी क्लिनिक हॉलच्या ( Ruby Hall Clinic ) प्रत्यारोपणाचा परवाना (Organ Transplant Licence ) रद्द केला आहे. पुण्यातील किडनी रॅकेट (Kidney Racket) प्रकरणानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकसून तपासाचा अहवाल सादर होईपर्यंत लाईव्ह आणि कॅडेव्हर अशा दोन्ही प्रकारच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ साधना तायडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचं HT च्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत रुग्णालयाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. Live आणि Cadaver ट्रान्सप्लांट सध्या बंद राहणार आहे मात्र हॉस्पिटल नॉन-ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर किंवा NTORC म्हणून काम करू शकतात.
पुण्यात एक किडनी रॅकेट प्रकरण 5 एप्रिलला समोर आले आहे. त्यामध्ये अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला आपली पत्नी म्हणून दाखविलेली कागदपत्रे आणि त्यांच्या विवाहाचे खोटे पुरावे ग्राह्य धरून ससून हॉस्पिटलने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली होती. 'रुबी हॉल क्लिनिक'मध्ये त्यानंतर प्रत्यारोपण करण्यात आले. सुतार या महिलेला 15 लाख रुपये देण्याचे आमिष साळुंखे यांनी दाखविले होते; पण ते न मिळाल्याने सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. यावरून हॉस्पिटलमध्ये 'किडनी रॅकेट' असल्याचा संशय निर्माण झाला आहे. आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण खात्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली. आरोग्य विभागाने 'रुबी हॉल क्लिनिक' विरोधात कारवाई केली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून रुग्णालयावरही कारवाई केल्याचं वृत्त आहे.
HT च्या वृत्तानुसार 29 मार्च रोजी रुबी हॉल क्लिनिकने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, अमित साळुंखे आणि सोनल कदमवास यांच्यात 24 मार्च रोजी सकाळी 7 वाजता रूग्णालयात अदलाबदलीचा व्यवहार झाला होता. खाजगी रुग्णालयाने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार पत्रात दिलेल्याअ माहितीमध्ये 'आज, एका देणगीदाराच्या डिस्चार्जच्या वेळी, श्रीमती सुजाता अमित साळुंखे (श्री. अमित साळुंखे यांच्या पत्नी) या सौ. सोनल कदम यांच्या स्वॅप डोनर होत्या, असा दावा त्यांनी केला. मात्र ती पत्नी नाही आणि तिचे वेगळे नाव असलेले ओळखपत्र सादर केले.
कागदपत्रांची पडताळणी आणि पोलिस पडताळणीसह औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच प्रत्यारोपण करण्यात आले, असे सांगत रुग्णालयाने आपल्या भूमिकेचा बचाव केला. या प्रत्यारोपणाला ससून सामान्य रुग्णालयाच्या regional authorisation committee for organ transplant समितीने मान्यता दिली होती आणि दाता आणि प्राप्तकर्ता या दोघांच्या सर्व कागदपत्रांची समितीने रीतसर पडताळणी केली होती. मात्र तरीही काही चूकीचा प्रकार घडला असल्याच्या संशयावरून तक्रार दाखल केली जात आहे.