HDIL च्या संचालकांचे अपील, संपत्ती विकून पीएमसी बँकेचे कर्जफेड करा

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळाप्रकरणी एचडीआयएलचे (HDIL) संचालक आणि मुख्य आरोपींनी ईडीला (ED) त्यांची संपत्ती विकून बँकेचे कर्जफेड करा असे अपील केले आहे.

PMC Bank (Photo Credits-Twitter)

पंजाब अॅन्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळाप्रकरणी एचडीआयएलचे (HDIL) संचालक आणि मुख्य आरोपींनी ईडीला (ED) त्यांची संपत्ती विकून बँकेचे कर्जफेड करा असे अपील केले आहे. बुधवारी दोन्ही आरोपी सारंग-राकेश वधवान यांनी ईडी, इओडब्लू, अर्थिकमंत्रालय, भारतीय रिजर्व्ह बँक, राज्यपाल, उप राज्यपाल यांना पत्र लिहून त्यांची संपत्ती जप्त करुन विकावी असे म्हटले आहे.

या पत्रानुसार ज्या HDIL कंपनीवर कर्ज दिल्याने PMC बँकेवर निर्बंध लादण्यात आले त्याच एचडीएलच्या संचालकांनी त्यांचे यॉट, कार, विमान, बाईक विकून बँकेचे कर्ज फेडण्याची प्रक्रिया सुरु करावी असे सांगण्यात आले आहे. परंतु राकेश-सारंग वधवान यांनी पत्रात असे ही म्हटले आहे की, आमच्याविरोधात FIR मधून लावण्यात आलेला मनी लॉन्ड्रिंगचा आरोप फेटाळून लावत आहे. पण आमची संपत्ती विकून बँकेचे कर्ज फेडावे असे अपील वधवान परिवाराने केली आहे.

वधवान परिवाराकडे फेरिटी यॉट, फाल्कन एअरक्राफ्ट, ऑडी कार, रॉल्स रॉयस, बेंटले कॉन्टिनेंटल आणि 7 सीटर स्पीड बोट सुद्धा सहभागी आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणा आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचले आहे. यावर कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या घोटाळ्याप्रकरणी जवळजवळ 16 लाख खातेधाराकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर PMC बँक घोटाळाप्रकरणी राकेश-सारंग वधवान, वायराम सिंग यांना 23 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (मुंबई: PMC बॅंक खातेदारांची कोर्टाबाहेर घोषणाबाजी; राकेश वधवान, सारंग वाधवान यांना जामिन न देण्याची मागणी)

दरम्यान, आरबीआयने आर्थिक निर्बंध घातल्याने पीएमसी बॅंकेमधून खातेदारांना पैसे काढण्यावर बंधनं आहेत, मात्र नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निवेदनानुसार खातेदार सहा महिन्यांसाठी कमाल 40,000 रूपये बॅंक खात्यामधून काढू शकतात.