Hate Posts on Social Media: महाराष्ट्राला मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न? महाराष्ट्र सायबर सेलने हटवल्या सोशल मीडियावरील 700 द्वेषपूर्ण पोस्ट

गेल्या 15 दिवसांत जातीय पोस्टमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे

सोशल मीडिया (Photo Credits-Twitter)

मशिदींच्यावरील लाऊडस्पीकर वादानंतर आता सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्याला भडकावण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या (Maharashtra Cyber Cell) म्हणण्यानुसार, सेलने गेल्या 15 दिवसांत आतापर्यंत 700 पोस्ट हटवल्या आहेत, ज्या जातीय सलोखा बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील. महाराष्ट्र सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी अशा पोस्ट लिहिल्या आहेत त्यांच्याविरुद्ध 300 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

सायबर सेलच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काही लोकांच्या इनबॉक्समध्ये कलम 149 CRPC च्या चेतावणीची सूचना पाठवली आहे. ज्यावरून लोकांना समजते की त्यांच्या पोस्टवर नजर ठेवली जात आहे व असे लोक स्वतःच आपली पोस्ट डिलीट करतात. सेलनुसार अशा लोकांवर 2 प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. सर्वप्रथम, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नोडल अधिकाऱ्यांना पत्र लिहून अशा पोस्ट हटवण्यास सांगितले आहे. यासोबतच त्या प्रोफाईलची सर्व माहिती घेऊन संबंधित व्यक्तीवर सायबर युनिटला कारवाई करण्यास सांगितले गेले.

महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा पोस्ट्सचा उद्देश कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे आणि धार्मिक द्वेष पसरवणे हा आहे. गेल्या 15 दिवसांत जातीय पोस्टमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांतता व एकोपा कायम राहावा यासाठी राज्य पोलिसांनी सर्व विशेष तुकड्यांना सतर्क केले आहे. गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांकडून अनेक द्वेषपूर्ण भाषणे झाली आहेत. राव नवमी तसेच हनुमान जयंतीच्या दिवशीही अनेक घटना घडल्या आहेत. (हेही वाचा: देशात भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करावे, त्याची अंमलबजावणी बिहार व गुजरातपासून सुरु करावी; नेते संजय राऊत यांचे मोदी सरकारला आवाहन)

दरम्यान, राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर मुंबईतील 72 टक्के मशिदींनी अजानच्या वेळी लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. याशिवाय अनेक मशिदींनी सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद केला आहे. लाऊडस्पीकरच्या वापराबाबत राष्ट्रीय धोरण तयार करावे आणि ते आधी बिहार, दिल्ली आणि गुजरात या राज्यांमध्ये लागू करावे, अशी मागणी नेते संजय राऊत यांनी केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif