मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वडाळाकडे जाणारी हार्बर लाइन सेवा पुन्हा सुरू
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वडाळाकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड उपकरणात दुरस्ती करत पुन्हा हार्बर रेल्वे सेवा सुरु केली आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शिवडी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड उपकरणात (ओएचई) अथडळा निर्माण झाला होता. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वडाळाकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड उपकरणात दुरस्ती करत पुन्हा हार्बर रेल्वे सेवा सुरु केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु, कल्याण ते परळ स्थानका दरम्यान जलद रेल्वे सेवा दुपारी 3.06 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. सध्या या मार्गावरील सर्व रेल्वे धीम्या गतीने धावत आहेत.
हार्बर मार्गावरील शिवडी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी पहाटे 5 वाजता ओव्हरहेड उपकरणात अडथळा निर्माण झाला होता. यामुळे मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वडाळाकडे जाणारी रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून ताडतीने काम करत ओव्हरडेड उपकरणात दुरस्ती केली. सकाळी 7. 50 वाजल्यापासून या मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ते वडाळा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- मुंबई रेल्वे सुरु करणार विशेष 'बोट पथक', पूर आल्यास नागरिकांची करणार मदत
ट्विट-
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबदल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर ओव्हरहेड उपकरणाची दुरस्ती केल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांना याची माहिती देण्यात आली आहे.