लातूर मध्ये 1.25 कोटीचा गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त; 3 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणि जनहित पाहता गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर यासारख्या पदार्थांवर 2012 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अंतर्गत अन्नसुरक्षा आयुक्तांनी बंदी घातली आहे.
महाराष्ट्रात लातूर (Latur) मधील गंज गोलाई (Ganj Golai) भागामध्ये रविवार (10 ऑक्टोबर) दिवशी करण्यात आलेल्या कारवाई मध्ये 1.25 कोटीच्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूला जप्त करण्यात आले आहे. दरम्यान ही कारवाई असिस्टंट सुपरिडंट ऑफ पोलिस निकेतन कदम यांच्या नेतृत्त्वाखाली एका टीम कडून करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांना टीप मिळाली होती. नक्की वाचा: Amitabh Bachchan यांनी सोडली 'ती' पान मसाला कंपनीची जाहिरात, ब्रँडशी करार मोडला; जाणून घ्या कारण .
पोलिसांनी या कारवाई मध्ये प्रेमनाथ मोरे याच्या दुकानावर धाड टाकली आहे. प्रेमनाथ हा एजंसी शॉपचा मालक आहे. प्रेमनाथ मोरे सह माल जप्त करताना त्याच्या सहकार्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 जणांविरूद्ध विविध कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणि जनहित पाहता गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर यासारख्या पदार्थांवर 2012 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अंतर्गत अन्नसुरक्षा आयुक्तांनी बंदी घातली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या सेवन करण्यामुळे तोंडाचा कॅन्सर तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात हे वैज्ञानिक संशोधनामध्ये समोर आले आहे. महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन/ वाहतूक/ विक्री/ साठा/ वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र तरीही असे केल्यास विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो.