Mumbai Local मध्ये मद्यपान करणे पडले महागात; प्रवाशांनी दिला मनोसोक्त चोप (Video)
मुंबईची रेल्वे लोकलही या नियमाला अपवाद नाही. आता मुंबईच्या लोकलमध्ये दारू पिणाऱ्या लोकांना प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर येत आहे.
भारतीय रेल्वेमध्ये मद्य पिण्यास पूर्णतः मनाई आहे. मुंबईची रेल्वे लोकलही (Mumbai Local) या नियमाला अपवाद नाही. आता मुंबईच्या लोकलमध्ये दारू पिणाऱ्या लोकांना प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर येत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, सोशल मिडीयावर तो व्हायरल देखील होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकलमध्ये मद्य पिणाऱ्या लोकांना प्रवाशी चोप देत असताना दिसत आहेत. मात्र ही घटना मुंबईच्या कोणत्या लोकलमध्ये घडली याबाबतची माहिती समोर येऊ शकली नाही. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.
पहा व्हिडीओ -
ही घटना रात्रीच्यावेळी घडली असल्याचे जाणवते. लोकलमधील प्रवाशांची संख्या पाहता लोकलमध्ये गर्दी असल्याचेही जाणवते. अशा परिस्थितीत लोकल मध्ये मद्य पिण्याची इच्छा काही लोकांना झाली. ही बाब ध्यानात येताच इतर प्रवाशांनी ‘ही काय दारू पिण्याची जागा आहे का?’ असे म्हणत चोप देण्यास सुरुवात केली. मात्र इतके होऊनही मद्य पिणारी व्यक्ती भांडताना दिसून येत आहे.
(हेही वाचा: राजधानी एक्सप्रेसमध्ये दारू पिताना पकडले गेले रेल्वे अधिकारी; गुन्हा दाखल)
अखेर प्रवाशांनी या मद्यपींना चांगला धडा शिकवलाच. त्यानंतर मात्र या मद्य पिणाऱ्या लोकांनी माफी मागितलेली दिसून येत आहे. दरम्यान काही आठवड्यांपूर्वी राजधानी एक्स्प्रेसमध्ये दारू पिणाऱ्या सहा लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे हे सहा लोक रेल्वे अधिकारी असल्याचे समोर आले होते.