Grapes Export In Sangli: कांद्यानंतर सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष दरातही घसरण, शेतकरी कोंडीत

अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केली. आता त्याच प्रमाणे द्राक्ष उत्पादक (Grape Growers Farmers) शेतकरीही कोंडीत अडकला आहे. खास करुन सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष (Exportable Grapes in Sangli) उत्पादन करणारा शेतकरी कोंडीत आहे.

Grapes | Representative Image (Photo Credits: pixabay)

कांदा उत्पादक शेतकरी दर घसरल्याने आगोदरच चिंतेत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केली. आता त्याच प्रमाणे द्राक्ष उत्पादक (Grape Growers Farmers) शेतकरीही कोंडीत अडकला आहे. खास करुन सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष (Exportable Grapes in Sangli) उत्पादन करणारा शेतकरी कोंडीत आहे. यंदाच्या हंगामात निर्यातक्षम द्राक्षांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यात मुळात द्राक्ष म्हणजे नाशवंत माल. त्याचा साठा करता येत नाही. त्याचे मनुके किंवा बेदाने करता येतात परंतू, त्यासाठीची द्राक्षे वेगळी असतात. निर्यातक्षम द्राक्षांचे मनुके अथवा बेदाने बनवता येत नाहीत. बनवलेच तर त्याची गुणवत्ता राहात नाही. त्यामुळे ती बाजारातच विकावी लागतात. परिणामी दर घसरल्याने शेतकऱ्यांची कोंडी होते.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापारी प्रति किलो 25 ते 30 रुपये इतक्या कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्षांच्या दरात घट झाल्याने स्थानिक किमतीतही घट झाल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर द्राक्षाच्या किमती (निर्यातक्षम) प्रति किलो 60 ते 70 रुपये इतक्या आहेत. फेब्रुवारी महिना अखेरीस कोसळलेले दर किमान मार्च महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तरी वाढतील अशी आशा होती. मात्र, ती आशाही फोल ठरली आहे.

द्राक्ष पिकाची सध्या उलटी गंगा सुरु झाली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी निर्यात केली जाणारी द्राक्षे 20 ते 30 रुपये किलो दराने विकली जात असत. तेव्हा उत्पादन आणि निर्यात खर्चही कमी होता. आता मात्र त्यात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी इतक्या कमी किमतीत द्राक्षे विक्री करणे परवडत नाही. जर द्राक्षाला दरच मिळत नसेल तर व्यापारी म्हणेल त्या किमतीला द्राक्षे विकावी लागतात. कारण, ती साठवून ठेवण्याची कुठलीच पद्धत सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे नाशवंत माल असल्याने शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागतो, असे शेतकरी सांगतात. एका बाजूला निसर्गाचे आरिष्ठ आणि दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर होणारी दरांची घसरण यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif